विद्यापीठाच्या 12 अध्यासनांना प्रमुखच नाही; तर निधी आभावी रखडले बिरसा मुंडा अध्यासन 

विद्यापीठातील 19 पैकी केवळ 7 अध्यासनांना प्रमुख आहेत.

विद्यापीठाच्या 12 अध्यासनांना प्रमुखच नाही; तर निधी आभावी रखडले बिरसा मुंडा अध्यासन 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) कार्यरत असलेल्या 19 पैकी 12 अध्यासनांना (Chair) प्रमुखच नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यात आता बिरसा मुंडा (Birsa Munda chair) यांच्या नावाने सुरू केल्या जाणाऱ्या अध्यासनासाठी निधी उपलब्ध नसल्याने हे अध्यासन अद्याप सुरू होऊ शकले नसल्याची धक्कादायक माहिती उघडा झाली आहे.परिणामी विद्यापीठाची विचारपीठे खुंटवली जात असल्याची भावना अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहेत.त्यामुळे अध्यासन प्रमुख नियुक्तीची प्रक्रिया केव्हा सुरू होणार असा सवाल, उपस्थित केला जात आहे.

विद्यापीठात बिरसा मुंडा अध्यासन केव्हा स्थापना केले जाणार याबबात अधिसभेत प्रश्न उपस्थित केला जाणार आहे.काही महिन्यांपूर्वी अध्यासन स्थापनेचा निर्णय घेतल्यानंतर अद्याप बिरसा मुंडा यांच्या नावाने अध्यासन स्थापना झाले नाही.त्यामुळे अधिसभा सदस्य गणपत नांगरे याबाबत विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारणार आहेत.तसेच विद्यापीठातील 19 पैकी केवळ 7 अध्यासनांना प्रमुख आहेत. परिणामी इतर अध्यासने ओस पडली आहेत.त्यामुळे या अध्यासनांवर प्रमुख केव्हा नियुक्त केले जाणार ?असा प्रश्न निर्माण होत आहे.  

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत झालेल्या ठरावानुसार विद्यापीठात एखादे नवे अध्यासन निर्माण करावयाचे झाल्यास त्यांच्या खर्चापोटी पुरेसे व्याज उपलब्ध होईल, एवढा म्हणजे किमान 2 कोटी स्थायी निधी / देणगी असल्याशिवाय नव्याने अध्यासन निर्माण करून नये, असा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे 2 कोटी स्थायी निधी / देणगी प्राप्त झाल्यानंतर बिरसा मुंडा अध्यासन निर्माण केले जाणार आहे.त्याबाबत नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत डॉ.व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. डी.बी. पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

दरम्यान, थोर महापुरूष व विचारवंतांच्या नावाने सुरू झालेली अध्यासने ही एक प्रकारची  विचारपीठे आहेत.या अध्यासनांनी समाजात जाऊन थोर महापुरूषांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे.तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करून दिशा भटकत चाललेल्या समाजाला जागृत करणे आवश्यक आहे.मात्र अध्यासनांची पदे रिक्त ठेऊन ही विचारपीठे खुंटवण्याचे काम होत आहे, अशी भावना काही अधिसभा सदस्यांकडून व्यक्त केली जात आहे. 

------------------------------------

विद्यापीठात बिरसा मुंडा यांच्या नावाने अध्यासन स्थापन होणार आहे.मात्र, विद्यापीठाकडे निधी नसल्याने अद्याप अध्यासन स्थापन होऊ शकले नाही.विद्यापीठ प्रशासनाने आमच्या सारख्या अधिसभा सदस्यांची मदत घेतली असती तर दोन कोटी पेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला असता.मात्र, विद्यापीठ प्रशासनाचा कारभार अत्यंत संथ आहे.त्यावर 23 मार्च रोजीच्या अधिसभेत विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारणार आहे. 
- गणपत नांगरे, अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे