CBSE पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध

वेळापत्रक CBSE च्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे.

CBSE पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE)  पुरवणी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE)  इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या पुरवणी परीक्षेसाठीचे अंतिम वेळापत्रक (Final Timetable) प्रसिद्ध केले आहे. दोन्ही वर्गांचे अंतिम वेळापत्रक CBSE च्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर पीडीएफ (PDF) स्वरूपात उपलब्ध आहे. त्यामुळे  विद्यार्थी दिलेल्या अधिकृत वेबसाइटवरून वेळापत्रक डाउनलोड करू शकतात.  

CBSE ने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, इयत्ता 10 वीच्या विविध विषयांच्या परीक्षा 15, 16, 18, 19, 20 आणि 22 जुलै 2024 रोजी नियुक्त परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. याशिवाय इयत्ता 12 वीच्या सर्व विषयांची परीक्षा 15 जुलै 2024 रोजी एकाच दिवशी घेतली जाईल. दोन्ही वर्गांच्या बोर्डाच्या परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेतल्या जातील. परीक्षेची वेळ सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 अशी असणार आहे.

 परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे हॉल तिकीट (Halltickets) CBSE द्वारे परीक्षेच्या तारखेच्या काही दिवस आधी प्रसिद्ध केले जाईल. परीक्षा केंद्रावर जाताना विद्यार्थ्यांकडे  प्रवेशपत्र असणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे हॉल टिकीटाशी संबंधित माहितीसाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी,असा सल्ला सीबीएसई बोर्डाकडून देण्यात आला आहे.