धक्कादायक घटना! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती DGCA ने दिली आहे. लँडिंग करताना काही तांत्रिक दोषामुळे विमान कोसळले आणि त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. याठिकाणी धूराचे मोठे लोट आले. तर विमानाला मोठी आग लागली. त्यात हे विमान जळून खाक झाले.

धक्कादायक घटना! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्याला हदरवणारी घटना घडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या विमानाला बारामती इथे मोठा अपघात (a plane crash) झाला आहे. या विमानात अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा जागीच मृत्यू (Ajit Pawar died) झाला आहे. अजित पवारांना घेऊन जाणारे छोटे विमान हे जळून खाक झालं आहे. बारामती दौऱ्यासाठी (Baramati campaign tour) ते आले होते. विमानतळाजवळच हे विमान कोसळले. या अपघातात दादांचे दोन सहाय्यक, पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू (Six people died in the plane crash) झाल्याची माहिती समोर येत आहे. या वृत्ताने राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा - राज्यात मराठी भाषा न शिकवणाऱ्या शाळांवर कारवाई होणार; शिक्षण विभागाचे निर्देश

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती DGCA ने दिली आहे. लँडिंग करताना काही तांत्रिक दोषामुळे विमान कोसळले आणि त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आल्याने कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. 

बारामती विमानतळाजवळील शेतात त्यांचे विमान कोसळले. विमानाला भीषण आग लागली. आज अजितदादांच्या चार सभा होत्या. त्यासाठी ते येत होते. दरम्यान हे विमान विमानतळाजवळील शेतात कोसळले. त्यावेळी लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. यंत्रणा ही धावल्या. पण अपघात अत्यंत भीषण होता. मुंबईवरून ते बारामतीसाठी निघाले होते. या विमान अपघाताने पवार कुटुंबियावर शोककळा पसरली आहे. 

जिल्हा परिषद आणि पंचाय समितीच्या निवडणुकीसाठी अजितदादांनी प्रचार सुरू केला होता. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीसाठी एकत्र आल्या होत्या. महानगर पालिका निवडणुकीचा निकाल पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी त्यांनी प्रचाराला वेग घेतला होता. हा अपघात नेमका कशामुळे झाला. तांत्रिक बाब काय, या सर्व प्रकरणाची चौकशी विमानतळ प्रशासनाने सुरू केली आहे.  

"अजितदादा सुमारे चार दशकांच्या कठोर मेहनतीने उभे राहिलेले नेतृत्व एका क्षणात आपल्यातून गेले. शब्दाला जागणारे, प्रशासनावर उत्तम पकड असलेले आणि तळागाळातील लोकांशी घट्ट जोडले गेलेले एक उत्तुंग नेतृत्व आज अजितदादांच्या रूपाने महाराष्ट्राने गमावले आहे. ही हानी पवार कुटुंबियांसह संपूर्ण महाराष्ट्राची आहे. या दुःखद क्षणात आम्ही सर्वजण पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत," अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.