AI मुळे जॉब: इन्फोसिसमध्ये 20 हजार कॉलेजच्या पदवीधारांची होणार भरती

पारेख म्हणाले,पारंपरिक कामाच्या काही भागांवर दबाव येत असला तरी आम्हाला काही ठिकाणी घट आणि काही ठिकाणी वाढ दिसत आहे. घट दिसण्यापेक्षा आम्हाला थोडीशी वाढ जास्तच दिसत आहे.

AI मुळे जॉब: इन्फोसिसमध्ये  20 हजार कॉलेजच्या पदवीधारांची होणार भरती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इन्फोसिस (Infosys)या कंपनीतर्फे पुढील वर्षभरात 20 हजार महाविद्यालयीन पदवीधारकांची भरती केली जाणार आहे. इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांनी दावोस येथील जागतिक आर्थिक मंचच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने ही माहिती दिली .कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय वाढीच्या संधी लक्षात घेता महाविद्यालयीन तरुणांसाठी इन्फोसिसच्या माध्यमातून नवीन रोजगार उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

इन्फोसिसतर्फे एक एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 या कालावधीत ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे. कंपनीने या आधीच आपल्या योजनेत याचा समावेश केला आहे, अशी माहिती पारेख यांनी एका वृत्तसंस्थेला दिली. 2026 च्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये इन्फोसिस कडून अठरा हजार महाविद्यालयीन पदवीधरांची भरती केली जाणार असून त्यानंतर पुढील तीन महिन्यात पाच हजारापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. 

इन्फोसिस ला यामुळे अनेक संधी उपलब्ध झाल्याचे दिसत आहे असे नमूद करून पारेख म्हणाले,पारंपरिक कामाच्या काही भागांवर दबाव येत असला तरी आम्हाला काही ठिकाणी घट आणि काही ठिकाणी वाढ दिसत आहे. घट दिसण्यापेक्षा आम्हाला थोडीशी वाढ जास्तच दिसत आहे.