औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'पीएम सेतू योजना' राबण्यात येणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत 5 महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. या बैठकीत युवकांसाठी रोजगार, कंत्राटदारांची थकीत बिले, शासकीय जमिनीच्या भाडेपट्टे कालावधी याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये पीएम सेतू योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती दिली.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळ बैठक [State Cabinet Meeting) पार पडली. या बैठकीत 5 महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. या बैठकीत युवकांसाठी रोजगार, कंत्राटदारांची थकीत बिले, शासकीय जमिनीच्या भाडेपट्टे कालावधी याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (Industrial Training Institute) पीएम सेतू योजना (PM Setu Yojana) राबवण्यात येणार असल्याची माहिती दिली.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेअंती संबंधित क्षेत्राशी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे आता राज्याती अनेक बेरोजगार युवकाने रोजगार मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये 'पीएम सेतू' योजना राबविण्यात येणार आहे.
राज्य सरकारने गेतलेल्या या निर्णयामुळे होतकरू युवकांना दिलासा मिळणार असून पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल. आणि पुढील टप्प्यात राज्यातील अन्य संस्थांचा समावेश करून ही योजना राबवण्यात येईल. या पीएम सेतू मुळे उमेदवारांना रोजगार संधी मिळवणे सोपे होणार आहे.