सिद्धी वस्त्रे २२ वर्षीय विद्यार्थिनी बनली मोहोळची नगराध्यक्ष

नूतन नगराध्यक्ष सिद्धीचे शिक्षण बी. कॉम. पर्यंत झाले असून सध्या ती गरड महाविघालयातून एम.कॉमचे शिक्षण घेत आहे. तिचे वडील राजू वस्त्रे हे एका खासगी पतसंस्थेमध्ये नौकरी करत होते. पतसंस्था बंद पडल्यानंतर सध्या ते शेती करतात. तर आई तेजश्री या घरकाम करतात. एकीकडे शिक्षण पूर्ण करत सिद्धी एक सीए फर्ममध्ये नोकरीही करत होती.

सिद्धी वस्त्रे २२ वर्षीय विद्यार्थिनी बनली मोहोळची नगराध्यक्ष

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नुकत्याच हाती आलेल्या नगरपरिषदांच्या मतमोजणीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष (Mayor of Mohol Municipal Council) म्हणून सिद्धी वस्त्रे हिची निवड (Siddhi Vastre won the election) झाली आहे. २२ वर्षीय सिद्धी वस्त्रे (College student becomes mayor) हिने नुकतेच बी. काॅम चे शिक्षण पूर्ण (Completed B.Com education) केले आहे. मात्र, घरातील राजकारणाचे बाळकडू तिला अधिच मिळाले. त्यामुळे शिक्षण घेत असताना आडल्या नडल्यांना मदत करणे, त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेणे आणि त्यांनी मदत करणे, यांसारखी छोटी मोठी कामे ती करत होती. समाजसेवा करत करत यातून तिला राजकारणाची आवड निर्माण झाली. पहिल्याच संधीत ती मोहोळ मधील बलाढ्या राजकारण्यांना शह देत नगराध्यक्ष झाली. 

हेही वाचा - राज्य मंडाळाच्या शाळांना सीबीएसई, ग्लोबल, इंटरनॅशनल नाव असल्यास बेकायदेशीर ठरणार..

विद्यार्थी दशेत महाविद्यालयात असताना देखील ती मित्र-मैत्रिणच्या समस्या सोडवायची.  समाजसेवा करायची आणि लोकांची सेवा करायची असा तिचा ध्यास होता. त्यामुळे तिने राजकारणात उडी घेतली निवडणुकीला उभी राहिली आणि विजयश्री खेचून आणली. यामध्ये सर्वात मोठा वाट हा मोहोळकरांचा असल्याचे तिने सांगितले. तसेच हा विजय नेतिकतेचा व जनसामान्यांचा आहे, असे तिने स्पष्ट केले आहे. 

मोहोळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी अवघे २२ वर्ष वय असलेली सिद्धी राजू वस्त्रे विजयी झाली आहे. सिद्धी वस्त्रे राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष ठरली आहे. तत्कालीन मोहोळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राहिलेल्या आजोबा कै. विश्वनाथ वस्त्रे यांचा राजकीय वारसा सिद्धी पुढे चालवीत आहे. या विजयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिला शुभेच्छा दिल्या. 

मोहोळ शहरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात सिद्धीचा जन्म झाला. सिद्धीचे आजोबा कै. विश्वनाथ शिवराज वस्त्रे शहरातील गवत्या मारुती चौकातील विरभद्र देवाचे मुख्य मानकरी होते. तसेच सुमारे ३० वर्षांपूर्वी मोहोळ ग्रामपंचायतचे सरपंचपद ही त्यांनी भूषविले होते. कै. विश्वनाथ वस्त्रे यांना तीन मुले असून त्यापैकी राजू वस्त्रे यांची सिद्धी ही कन्या आहे.

नूतन नगराध्यक्ष सिद्धीचे शिक्षण बी. कॉम. पर्यंत झाले असून सध्या ती गरड महाविघालयातून एम.कॉमचे शिक्षण घेत आहे. तिचे वडील राजू वस्त्रे हे एका खासगी पतसंस्थेमध्ये नौकरी करत होते. पतसंस्था बंद पडल्यानंतर सध्या ते शेती करतात. तर आई तेजश्री या घरकाम करतात. एकीकडे शिक्षण पूर्ण करत सिद्धी एक सीए फर्ममध्ये नोकरीही करत होती.