CBSE C-TET परीक्षेची सिटी स्लिप प्रसिध्द

परीक्षेसाठी नोंदणी केलेले सर्व उमेदवार https://ctet.nic.in/ च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे परीक्षा केंद्र तपासू शकतात.

CBSE C-TET परीक्षेची सिटी स्लिप प्रसिध्द

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क  

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (C-TET) 2024 शहर माहिती स्लिप (City Slip) प्रसिद्ध केली आहे. परीक्षेसाठी नोंदणी केलेले सर्व उमेदवार https://ctet.nic.in/  च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे परीक्षा केंद्र तपासू शकतात.  

CTET परीक्षा 7 जुलै 2024 रोजी 2:30 तासांच्या कालावधीसाठी दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. C-TET पेपर दोनची परीक्षा सकाळी 9.30 ते दुपारी 12 या वेळेत होणार आहे,  तर पेपर एकच्या परीक्षेची वेळ दुपारी 2 ते 4:30 अशी करण्यात आली आहे. 

CTET पेपर 1 ची परीक्षा इयत्ता 1 ते 5 वी साठी शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीसाठी घेतली जाईल, तर पेपर 2 ची परीक्षा इयत्ता 6 वी ते 8 वी साठी शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीसाठी असणार आहे. 

असही करा सिटी स्लिप डाउनलोड  

CTET परीक्षा सिटी स्लिप डाउनलोड लिंक उघडा. त्यानंतर आपले लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा. स्क्रीनवर दिसणारी CTET परीक्षा सिटी स्लिप तपासा व डाउनलोड करा आणि भविष्यासाठी हार्ड कॉपीची प्रिंट काढा.

परीक्षा केंद्राचे नाव, पेपरची वेळ आणि इतर तपशील C-TET प्रवेशपत्रावर नमूद केले जातील. परीक्षेच्या दिवशी, उमेदवारांनी CTET प्रवेशपत्राची प्रत, एक वैध फोटो ओळखपत्र आणि इतर विहित कागदपत्रे आणणे आवश्यक आहे, अशी सूचना CBSE  बोर्डाकडून देण्यात आली आहे.