वर्गात चक्कर आल्याने, सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू

दिव्या प्रितेश त्रिपाठी (वय ११) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेने दिव्याच्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

वर्गात चक्कर आल्याने, सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) सिडको परिसरातील एका शाळेत सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू (Death of a student) झाला. त्यामुळे या शाळेत एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थीनी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. पण, शाळेत गेल्यानंतर ती चक्कर येऊन बाकावरुन खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला आहे. दिव्या प्रितेश त्रिपाठी (Divya Pritesh Tripathi) (वय ११) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेने दिव्याच्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, तर शाळेतही हळहळ व्यक्त केली जात आहे. 

राजलक्ष्मी अपार्टमेंट जगताप नगर उंटवाडी येथे राहणारी दिव्या नेहमी प्रमाणे सकाळी शाळेत आली. शाळेमध्ये आल्यानंतर ती वर्गात बसलेली होती. मात्र अचानक दिव्याला चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली. शाळेतील शिक्षकांनी तात्काळ तिला उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. ही दुर्दैवी घटना सिडकोतील उपेंद्रनगर येथील रुद्र द प्रॅक्टिकल स्कूलमध्ये घडली आहे. 

शिक्षणासाठी पैसे नसल्याने गुणवंत विद्यार्थीनीची आत्महत्या; दहावी होते ९३.८० गुण

पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दिव्या त्रिपाठी ही विद्यार्थिनी स्कूल व्हॅनमधून शाळेत आली. शाळेत तिच्या वर्गामध्ये येऊन बेंचवर बसलेली असताना अचानक तिला चक्कर आली आणि ती बाकावरुन खाली पडली. ती बेशुद्ध झाली होती. दिव्याला पडलेले पाहून आजूबाजूच्या विद्यार्थ्यांनी आरडाओरड केली. तेव्हा शिक्षकांनी दिव्याचे वडील रितेश वाल्मीक त्रिपाठी यांच्याशी संपर्क केला.

त्यानंतर पुढील उपचारासाठी दिव्याला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉ. गोटे यांनी तपासून दिव्याला मृत घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.