CBSE दहावी, बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल 

CBSE च्या इयत्ता दहावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी ते १३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहेत.

CBSE दहावी, बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या (CBSE) दहावी , बारावीच्या  विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती समोर येत आहे.  CBSE ने इयत्ता दहावी , बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या  वेळापत्रकात  बदल केला असून सुधारित वेळापत्रक बोर्डाच्या  cbse.gov.in अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. 

सीबीएसईने  ४ मार्च रोजी नियोजित केलेला इयत्ता दहावीचा तिबेटी पेपर आता २३ फेब्रुवारीला  होणार आहे.  तर रिटेल याविषयीचा पेपर १६ फेब्रुवारी एवजी आता २८ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे. तसेच  इयत्ता बारावीची फॅशन स्टडीज  विषयाची परीक्षा ११ मार्च एवजी २१ मार्च रोजी घेतली जाईल. CBSE च्या इयत्ता दहावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी ते १३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहेत. तर सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी ते २ एप्रिल २०२४ या कालावधीत होतील. पेपर सकाळी १०.३०  वाजता सुरू होणार आहेत. 


CBSE सुधारित डेटशीट याप्रमाणे डाउनलोड करा
* www.cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
* होमपेजवर इयत्ता दहावी , बारावीच्या डेट शीट लिंकवर क्लिक करा.
* डेटाशीट स्क्रीनवर दिसेल.
* परीक्षेचे वेळापत्रक तपासा आणि डाउनलोड करा.
* भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.