आयआयटी मुंबईच्या ८५ विद्यार्थ्यांना १ कोटीचे पॅकेज

६३ विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय नोकरीची ऑफर मिळाली आहे. 

आयआयटी मुंबईच्या ८५ विद्यार्थ्यांना  १  कोटीचे पॅकेज

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सध्या देशातील विविध आयआयटी कॅम्पसमध्ये प्लेसमेंटची प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यंत आयआयटीच्या विद्यार्थ्यांना मोठ्या पगाराची नोकरी मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यात आता आयआयटी मुंबईमधून (IIT Mumbai)एक महत्वाची माहिती समोर आली असून आयआयटी मुंबईच्या ८५ विद्यार्थ्यांना तब्बल एक कोटीचे पॅकेज मिळाले तर ६३ विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय नोकरीची ऑफर मिळाली आहे. 

आयआयटी कॅम्पसला भेट देणार्‍या काही प्रमुख कंपन्यांमध्ये  एक्सेंचर, एअरबस, एअर इंडिया, ऍपल, आर्थर डी. लिटल, बजाज, बार्कलेज, कोहेसिटी, दा विंची, डीएचएल, फुलरटन, फ्यूचर फर्स्ट, जीई-आयटीसी, ग्लोबल एनर्जी आणि पर्यावरण आणि Google यांचा समावेश आहे. या कॅम्पस इंटरव्यू मधून ८५  विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये 1 कोटी रुपयांचे पॅकेज मिळवले आहे. तर  63 विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय ऑफर मिळाल्या आहेत. 

हेही वाचा : बार्टी, सारथी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्या : नितिन गडकरी 

विद्यार्थ्यांना जपान, तैवान, दक्षिण कोरिया, नेदरलँड, सिंगापूर आणि हाँगकाँगमधील कंपन्यांकडून ६३ आंतरराष्ट्रीय ऑफर मिळाल्या आहेत. IIT मुंबई  मधील प्लेसमेंट सीझन २०२३-२४ चा पहिला टप्पा संपला आहे. यामध्ये ३८८ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी सहभाग घेतला होता, अशी माहिती आयआयटीकडून देण्यात आली आहे.