शाळेच्या आवारातील पान टपऱ्यांवर हातोडा; मुख्यमंत्र्यांचे स्थानिक प्रशासनाला आदेश 

शाळेच्या आवारात असणाऱ्या पान टपऱ्यांकडे वळाला आहे. त्यासंबंधित त्यांनी स्थानिक प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

शाळेच्या आवारातील पान टपऱ्यांवर हातोडा; मुख्यमंत्र्यांचे स्थानिक प्रशासनाला आदेश 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाचा (Pune Drug Case) मुद्दा काही केल्या थंड होण्याचे नाव घेताना दिसत नाही. ड्रग्ज, बार आणि रात्रभर चालणाऱ्या पब मालकांवर कारवाईचा हातोडा उगारला असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा मोर्चा शाळेच्या आवारात असणाऱ्या पान टपऱ्यांकडे वळाला आहे. त्यासंबंधित त्यांनी स्थानिक प्रशासनाला कारवाई (trespass action) करण्याचे आदेश दिले आहेत. 

शाळांच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस बंदी आहे. तरीही अनेक शाळा व कॉलेजांच्या परिसरात तंबाखू व सिगारेटची सर्रास विक्री सुरू आहे. शाळकरी मुले सुरवातीला सहजपणे गंमत म्हणून याकडे वळतात. नंतर, व्यसने ही त्यांची गरज होते. कालांतराने हे विद्यार्थी व्यसनांच्या पूर्णपणे आहारी जातात.  त्यामुळे शाळेच्या आवारातील सर्व टपऱ्या तोडा, असे आदेश मुख्यमंत्री यांनी प्रशासनाला दिले आहेत. 

शाळेतील बहुतेक मुले ही वयाने मोठ्या असणाऱ्यांची कृती करण्याचा प्रयत्न करत असतात. शाळेतील मुले आवारात असलेल्या टपऱ्यांवर सिगारेट, तंबाखू, गुटखा यांसारखे व्यसन करणाऱ्या नागरीकांचे निरीक्षण करतात. आधी बडीशेप, सुपारी, आणि पान यासारखे व्यसन करतात. त्यामुळे सध्या शाळकरी मुले वाईट व्यसनाच्या आहारी जाताना दिसून येतात.  उद्या हिच मुले मोठी झाल्यानंतर ड्रग्ज सारख्या व्यसनाला बळी पडतात आणि मग नको ते प्रकार घडतात. त्यामुळे शाळकरी मुलांना कोणत्याही वाईट सवय लागू नये,असा यामागचा शासनाचा हेतू आहे. 

अविचारी वय, जाहिरात माध्यमांचा प्रभाव, शैक्षणिक संस्थांच्या परिसरात सहजपणे होणारी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, संगतीचा परिणाम व एकदा चव घेण्याचा मोह आदी कारणांमुळे १० ते १६ वयोगटातील शाळकरी मुलांमध्ये तंबाखू, गुटखा, पानमसाला व सिगारेटच्या व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे कारवाईचे पाऊल उचलले आहे.