ऐकावं ते नवलच ! या महिला सिनेट मेंबरला हवी चक्क मोती रंगाची साडी
पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात गणवेश म्हणून मोती रंगाच्या साडीचा समावेश करण्याची मागणी एका महिला सदस्याने केली आहे.विद्यापीठाच्या येत्या ११ मार्च रोजी होणाऱ्या अधिसभेच्या कार्यक्रमात पत्रिकेत या आशयाचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला आहे.
विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात आगळा वेगळा पोषाख परिधान करून मिरवण्याची सर्वांनाच इच्छा असते.पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटर निवड झालेल्या एका महिला सदस्याने पदवीप्रदान समारंभाच्या निमित्ताने परिधान केल्या जाणाऱ्या गणवेशात मोती रंगाची साडी असावी, असा थेट प्रस्तावच विद्यापीठाच्या अधिसभेसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे.
विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात आकर्षक गाऊन व टोपी परिधान करणारे विविध अधिकार मंडळाचे सदस्य हा नेहमीच आकर्षणाचा विषय असतो. विद्यार्थी सुद्धा काळ्या रंगाचे गाऊन परिधान करून पदवी प्रमाणपत्रासह छायाचित्र काढण्यासाठी गर्दी करतात.मात्र, विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर निवडून गेलेल्या डॉ.अपूर्वा लळिंगकर यांनी पदवीप्रदान समारंभात गणवेश म्हणून मोती रंगाच्या साडीचा समावेश करण्याची मागणी केली आहे.विद्यापीठाच्या येत्या ११ मार्च रोजी होणाऱ्या अधिसभेच्या कार्यक्रमात पत्रिकेत या आशयाचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला आहे.
विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर निवडून गेलेल्या सर्व सदस्यांना विद्यापीठाच्या खर्चातून पदवीप्रदान समारंभासाठी विशिष्ट प्रकारचा पोषाख उपलब्ध करून दिला जातो.त्यामुळे मोती रंगाची साडी परिधान करण्याच्या मागणीला मंजुरी देण्यात आली तर विद्यापीठावर साडी खरेदीचा बोजा पडणार आहे.त्यामुळे विद्यापीठाच्या अधिसभेत या प्रस्तावावर काय निर्णय घेतला जातो.हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
eduvarta@gmail.com