विद्यार्थी,पालकांची दिशाभूल करणाऱ्यांना CBSE बोर्डाचा दणका; 30 सोशल मीडिया हँडलवर कारवाई

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने ट्विटरवर बोर्डाचे नाव किंवा लोगो वापरणाऱ्या 30 सोशल मीडिया हँडलवर कारवाई केली आहे. 

विद्यार्थी,पालकांची दिशाभूल करणाऱ्यांना CBSE बोर्डाचा दणका; 30 सोशल मीडिया हँडलवर कारवाई

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) बोर्डाकडून 10 वी, 12 वी च्या परीक्षांमध्ये (10th, 12th Exams) करण्यात आलेले महत्वाचे बदल, परीक्षांच्या जवळ आलेल्या तारखा या पार्शवभूमीवर सोशल मीडियावर (Social Media Viral) माहिती व्हायरल होत आहे. यातील काही बाबी खोट्या असल्याचे आढळून आले आहे.त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल होत आहे, असे प्रकार रोखण्यासाठी CBSE बोर्डाने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) ट्विटरवर बोर्डाचे नाव किंवा लोगो वापरणाऱ्या 30 सोशल मीडिया हँडलवर कारवाई (Action on media handle) केली आहे. 

बोर्डाने अशी 30 खाती शोधली आहेत ज्यात एकतर त्यांच्या नावात किंवा वापरकर्त्याच्या नावात CBSE चे नाव समाविष्ट आहे.  या यादीमध्ये सीबीएसईचे नाव किंवा बोर्डाचा लोगो वापरत असलेल्या खात्यांचा समावेश आहे. या खात्यांचा वापर करून सर्वसामान्यांची दिशाभूल केली जाऊ शकते किंवा चुकीची माहिती दिली जाऊ शकते, असे बोर्डाचे म्हणणे आहे. 

बोर्डाने म्हटले आहे की, "सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणत्याही शैलीत CBSE चे नाव आणि लोगो वापरून इतर कोणत्याही स्त्रोताने दिलेल्या माहितीसाठी बोर्ड जबाबदार राहणार नाही." CBSE ने विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना आणि इतरांना बोर्डाशी संबंधित सत्यापित आणि प्रामाणिक माहितीसाठी फक्त अधिकृत X हँडल, @cbseindia29 चे अनुसरण करण्याचा सल्ला दिला आहे.