टिळक रोड वरील लोहिया शाळेत 'मार्केट डे' साजरा;  विद्यार्थ्यांमध्ये आनंदी आनंद.. 

मुलांना प्रत्यक्ष भाज्यांची ओळख व्हावी, खरेदी-विक्री व्यवहार माहिती व्हावी या उद्देशाने मुख्याध्यापिका  माधुरी बर्वे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला उपक्रम

टिळक रोड वरील लोहिया शाळेत 'मार्केट डे' साजरा;  विद्यार्थ्यांमध्ये आनंदी आनंद.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ (Academic year 2023-24) सत्रातील दोन महिने शिल्लक राहिले आहेत. पुढील महिना परीक्षांच्या अनुषंघाने महत्वाचा असणार आहे. त्यापार्श्वभुमीवर बहुतांश शाळेत सध्या विविध डे व कार्यक्रम पार पडत आहेत. टिळक रोड वरील डेक्कन एजुकेशन सोसायटीची मुरलीधर लोहिया पूर्व प्राथमिक शाळेत (Muralidhar Lohia Primary School) 'मार्केट डे' ('Market Day') मोठ्या उत्साहात साजरा झाला. शाळा समितीच्या अध्यक्षा ॲड. राजश्री ठकार (Adv. Rajshri thakar) यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळेत सगळीकडे आनंदी आनंद असे वातावरण तयार झाले आहे. 

शाळेत साजरा केल्या जाणाऱ्या मार्केट डे मध्ये शाळेतील मुलेच विक्रेते आणि ग्राहक होते. बाजारात गाजर, मटार, मेथी, पालक, कोथिंबीर, कांदे, बटाटे यांसारख्या भाज्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या.  यावेळी बाजारात रोकड विरहीत (कॅशलेस) व्यवहारासाठी शेजारीच एटीएम मशीनची प्रतिकृती तयार होती. मुले हुबेहुब भाजी विक्रेत्यांच्या वेशभूषात आली होती. बरोबर भाजी खरेदी करण्यासाठी पर्यावरणपूरक कापडी पिशवी आणली होती. आपल्याकडून भाजी घ्यावी म्हणून आरोळ्यांच्या कल्लोळाने खरेखुरे बाजाराचे स्वरुप प्राप्त झाले होते. 

आपल्याला आवडणारी भाजी आपण घेत आहोत याचा मुलांना काही वेगळात आनंद वाटत होता. मुलांना प्रत्यक्ष भाज्यांची ओळख व्हावी, खरेदी-विक्री व्यवहार माहिती व्हावी या उद्देशाने मुख्याध्यापिका  माधुरी बर्वे यांच्या नेतृत्वाखालील उपक्रम पार पडला. यामुळे मुलांना बाजार कसा करावा, पैशांचे गणित, व्यवहार या गोष्टींचा थोडा अनुभव नक्कीच आला असावा.