Harsha Pisal News : राज्य अभ्यासक्रम आराखडा सदस्य पदी हर्षा पिसाळ यांची नियुक्ती

हर्षा पिसाळ या शाळेत विद्यार्थ्यांची कुवत ओळखून तशा पद्धतीने उपक्रम घेत असतात.

Harsha Pisal News : राज्य अभ्यासक्रम आराखडा सदस्य पदी हर्षा पिसाळ यांची नियुक्ती
Harsha Pisal

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क : 

Harsha Pisal Appointment News : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून राज्य अभ्यासक्रम आराखडा विकसित करण्याच्या दृष्टीने समिती स्थापना केली जात आहे. त्यात शालेय हर्षा बाळकृष्ण पिसाळ -निगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभ्यासक्रम आराखडा- शालेय शिक्षण (SCF-SE) विकसीत करण्यासाठी समिती सदस्य राज्यव्यापी निवड प्रक्रिया घेण्यात आली. त्यात पिसाळ यांची निवड झाली आहे. 

हर्षा पिसाळ या पुण्यातील आपटे रस्त्यावरील लक्ष्मणराव आपटे प्रशालेत (Laxman Rao Apte Prashala) गणित विज्ञान आणि सध्या इंग्रजी विषय दहावीपर्यंत शिकवत आहे.त्या आपटे प्रशालेत सहाय्यक शिक्षिका असून त्यांना राज्य शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारही मिळाला आहे. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकी ज्ञानातून बाहेर पडत कृतीशील शिक्षणाला प्राधान्य देण्याच्यादृष्टीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (NEP 2020) अनेक नाविण्यपूर्ण बदल करण्यात आले आहेत. पण त्याआधीच अनेक शिक्षकांकडून कृतीतून शिक्षण या संकल्पनेच्या आपल्या शाळेमध्ये अंमलबजावणी करत असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासात हर्षा पिसाळ (Harsha Pisal) यांनी हातभार लावला आहे. 

हर्षा पिसाळ या शाळेत विद्यार्थ्यांची कुवत ओळखून तशा पद्धतीने उपक्रम घेत असतात. तसेच वाचनाचा वेग वाढवण्यासाठी त्या नाविण्यपूर्ण उपक्रम राबवतात. गणिताची पेटी, उपकरणे बनवून सोप्या पद्धतीने गणित शिकविण्यावर त्यांचा भर असतो. तसेच विद्यार्थ्यांचा संशोधनातील सहभाग वाढावा, यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. एकंदरीत विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण देण्यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न आहेत. 

हेही वाचा : Teacher Recruitment News : आश्रम शाळेत 282 पदांची भरती होणार... अतुल सावेंची मोठी घोषणा

बालभारती तर्फे आयोजित एकात्मिक पाठ्यपुस्तकातील वहीच्या कोऱ्या पृष्ठांच्या प्रभावी वापरा संदर्भातील सूचनांचे परिपत्रक बनवण्यात पिसाळ यांचा सहभाग होता. इन्स्पयार अवॉर्ड, विज्ञान प्रदर्शन, निबंध, भाषण, क्रीडा अशा विविध स्पर्धांना त्या मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या 'मसाला माती' या प्रकल्पाची राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेतर्फे राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.