फर्ग्युसन महाविद्यालय मैदान : 'पुणे पुस्तक महोत्सवा'त होणार चार विश्वविक्रम

फर्ग्युसन महाविद्यालय मैदान : 'पुणे पुस्तक महोत्सवा'त होणार चार विश्वविक्रम

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

' राष्ट्रीय पुस्तक न्यासा ' च्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर (on the grounds of Ferguson College) येत्या 16 ते 24 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या 'पुणे पुस्तक महोत्सवा' त ( Pune Book Festival ) चार विश्वविक्रम प्रस्थापित केले जातील , अशी माहिती महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे (Coordinator Rajesh Pandey) यांनी शुक्रवारी दिली.

पांडे म्हणाले,  'पुण्याची वाचन संस्कृती जगात नेण्यासाठी या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यांची नोंद 'गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये व्हावी, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांना एकाच वेळी वाचन करून दाखविण्याचा उपक्रम येत्या 14 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर केला जाणार आहे. पुणे महापालिकेच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

हेही वाचा : शिक्षण UGC Certificate Courses : UGC कडून प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वांना मंजुरी

जास्तीत जास्त पुस्तकांनी तयार केलेला शब्द हा विक्रम येत्या 15 डिसेंबर रोजी फर्ग्युसन महाविद्यालयात करण्याच्या प्रयत्न आहे. त्यात 'भारत' या शब्दात अधिकाधिक पुस्तकांची रचना केली जाणार आहे.  'जयतू भारत' या वाक्यात जास्तीत जास्त पुस्तकांचा समावेश असेल. हा तिसरा विक्रम येत्या 16 डिसेंबर रोजी प्रस्थापित करण्याचा मानस आहे. तर अधिकाधिक लोकांनी मोठ्याने वाचन करण्याच्या व्हिडिओ अल्बमचा विश्वविक्रम येत्या 21 डिसेंबर रोजी केला जाईल. युनेस्कोच्या निकषांनुसार जागतिक पुस्तकांची राजधानी बनण्याची क्षमता पुणे शहरात आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या उद्देशाने या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे पांडे यांनी सांगितले.