Teacher Recruitment News : आश्रम शाळेत 282 पदांची भरती होणार... अतुल सावेंची मोठी घोषणा

राज्यातील आश्रम शाळेमध्ये एकूण 2,23,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

Teacher Recruitment News : आश्रम शाळेत 282 पदांची भरती होणार... अतुल सावेंची मोठी घोषणा
Atul Save

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क : 

Minister Atul Save Big Announcement : राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत एकूण 977 आश्रम शाळा चालविण्यात येतात. या आश्रम शाळांना शालेय पोषण, इमारत भाडे आणि वेतन अशा 3 भागात अनुदान देण्यात येत आहे. यावर्षी 225 कोटी रुपयांच्या तरतुदी पैकी आतापर्यंत 180 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. तसेच या शाळांमधील शिक्षकांची 282 पदे भरण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली, असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. 

आमदार विकास ठाकरे आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आश्रम शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांबाबात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मंत्री सावे यांनी या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. सावे म्हणाले, राज्यातील आश्रम शाळेमध्ये एकूण 2,23,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 

हेही वाचा : Vidhan Sabha Session : स्वाधार योजना अन् ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर वडेट्टीवारांनी सावेंना धरले धारेवर

इतर मागास प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही त्यांच्यासाठी थेट लाभ देण्याच्या 'आधार' योजनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून प्रति जिल्ह्यात 600 अशा एकूण 21,600 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

परदेशी शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची संख्या आता 50 वरून 75 इतकी वाढविण्यात आली असून आतापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली असल्याचे सावे यांनी विधानसभेत सांगितले.