'एकलव्य'च्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू;२२ फेब्रुवारीला परीक्षा 

या परीक्षेद्वारे सहावीत दोन हजार २२० नवीन, तर सातवी ते नववीच्या ८७३ रिक्त जागांवर गुणानुक्रमे प्रवेश दिला जाणार आहे. विभागनिहाय जागांचा विचार केला तर, नाशिक विभागात सर्वाधिक १ हजार १९२ जागा आहे.

'एकलव्य'च्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू;२२ फेब्रुवारीला परीक्षा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रातील एकलव्य मॉडल रेसिडेन्शियल स्कूलची (Eklavya Model Residential School) प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने प्रवेश पूर्व परीक्षेसाठी (Application process for pre-entrance exam begins) सोमवार दि. १५ डिसेंबरपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू (Online application process begins) करण्यात आली आहे.  त्याअंतर्गत येत्या २२ फेब्रुवारी २०२६ ला प्रवेशपूर्व परीक्षा (Pre-entrance exam on February 22, 2026) घेण्यात येणार आहे. या परीक्षेद्वारे सहावीत दोन हजार २२० नवीन, तर सातवी ते नववीच्या ८७३ रिक्त जागांवर गुणानुक्रमे प्रवेश दिला जाणार आहे. विभागनिहाय जागांचा विचार केला तर, नाशिक विभागात सर्वाधिक १ हजार १९२ जागा आहे, त्यानंतर नागपूर विभागात ९२३ जागा आहेत तर ठाणे विभागात ५८३ जागा आहेत आणि सर्वात कमी ३९५ जागा या अमरावती विभागात आहेत. या परीक्षेसाठी २०२५-२६ मध्ये पाचवी व आठवीमध्ये प्रवेशित अनुसूचित-आदिम जमातीचे विद्यार्थी पात्र असणार आहेत.

हेही वाचा - MBBS ॲडमिशन प्रकरणी फसवणूक; सोशल मीडियावर जाहिरात करून लुबाडले सव्वाशे कोटी

या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरूझाली आहे. संबंधित अपर आयुक्त कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, शासकीय आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्ये अर्ज विनामूल्य उपलब्ध असणार आहे. विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह त्याच कार्यालय अथवा शाळेत जमा करावेत. प्रवेश पूर्वपरीक्षेच्या अधिक माहितीसाठी https://tribal. maharashtra.gov.in अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे या आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी (नाशिक) मार्फत सीबीएसई बोर्डाच्या ३७ एकलव्य निवासी शाळा चालविल्या जातात. या ठिकाणी विद्याथ्यांना मोफत शिक्षण, निवास, भोजन, गणवेश आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी सातवी, आठवी, नववीसाठी रिक्त जागांचा अनुशेष भरण्यात येणार आहे. प्रत्येक एकलव्य स्कूलमध्ये सहावीसाठी ३० मुले व ३० मुली अशी ६० प्रवेश क्षमता असणार आहे. या सर्व जागांवर प्रवेश पूर्वपरीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची निश्चिती करण्यात येणार आहे.