शिक्षक भरती २०२५ साठी पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाणपत्र नोंदणी प्रक्रिया सुरू 

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ साठी प्रविष्ट झालेल्यांपैकी २ लाख ९ हजार १०१ उमेदवारांना पवित्र पोर्टलवर पुढील प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी त्यांचे स्व-प्रमाणपत्र करण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे. त्यासाठी ज्या उमेदवारांना शिक्षण सेवक/शिक्षक या रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे, त्या सर्व उमेदवारांना या पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाण पत्र तयार करणे बंधनकारक असणार आहे.

शिक्षक भरती २०२५ साठी पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाणपत्र नोंदणी प्रक्रिया सुरू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये (Local self-government institutions and privately managed schools) तसेच महाराट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये "पवित्र" या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीसाठी शासनामार्फत "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५" (Teacher Aptitude and Intelligence Test - 2025) या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ दिनांक २७ मे २०२५ ते ३० मे २०२५ व ०२ जून २०२५ ते ०५ जून २०२५ या कालावधीमध्ये घेण्यात आली होती. या चाचणीसाठी २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीची निवड प्रक्रिया करण्यासाठी परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र (Self Certification) करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. 

हेही वाचा - SBI बँकेत मेगा भरती! विविध पदांच्या ९९६ जागांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ साठी प्रविष्ट झालेल्यांपैकी २ लाख ९ हजार १०१ उमेदवारांना पवित्र पोर्टलवर पुढील प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी त्यांचे स्व-प्रमाणपत्र करण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे. त्यासाठी ज्या उमेदवारांना शिक्षण सेवक/शिक्षक या रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे, त्या सर्व उमेदवारांना या पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाण पत्र तयार करणे बंधनकारक असणार आहे.

उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्रामध्ये माहिती नमूद करण्यापूर्वी स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. पवित्र पोर्टल वरील नोंदणी व स्व-प्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतः करणे आवश्यक आहे. अर्ज मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असला तरी उमेदवाराने नोंदणी व स्व-प्रमाणपत्रासाठी आवश्यक माहिती इंग्रजीमध्ये भरावी. संक्षिप्त अथवा आद्याक्षरे न देता संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता नमूद करावा. उमेदवाराने स्वतःचे नाव, वडिलांचे पतीचे नाव, आडनाव यामध्ये एक स्पेस सोडावी तसेच पत्ता लिहिताना इमारतीचे नाव, रस्त्याचे नाव इत्यादींमध्ये एक स्पेस सोडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.