सर्वात तरुण उच्चशिक्षित नगराध्यक्ष म्हणून सौरभ तायडेची निवड  

विशेष म्हणजे शिक्षण घेत असलेल्या सोरभ तायडेची परवा २४ डिसेंबर रोजी शिक्षणशास्त्र पदव्युत्तर परीक्षेचा पेपर आहे. सिंदखेडराजा नगरीत तरुणांसाठी विशेष कार्य करायचंय, अशी भावना सौरभ तायडेची आहे.

सर्वात तरुण उच्चशिक्षित नगराध्यक्ष म्हणून सौरभ तायडेची निवड  

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा नगरपरिषदेच्या निवडणुकीत (Sindkhed Raja Municipal Council Election) शरद पवारांच्या नवख्या शिलेदाराने मैदान मारल्याचं समोर आलं आहे. प्रस्तावित उमेदवाराने निवडणूक काळात पक्षांतर केल्याने शरद पवार गटाकडे उमेदवारी कोणाला द्यावी असा प्रश्न पडला होता. पुढच्या तगड्या उमेदवाराच्या तोडीस तोड उमेदवार मिळला नाही. म्हणून अवघ्या २१ वर्षीय नवख्या तरुणाला उमेदवारी दिली आणि त्याने त्याचं सोनं केलं. सौरभ तायडे (Saurabh Tayade ) असे या उच्चशिक्षित तरुणाचे नाव आहे. त्याने रसायनशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्वात तरुण वयाचा नगराध्यक्ष (The youngest mayor) होण्याचा मान त्याला मिळवला आहे. 

विशेष म्हणजे शिक्षण घेत असलेल्या सोरभ तायडेची परवा २४ डिसेंबर रोजी शिक्षणशास्त्र पदव्युत्तर परीक्षेचा पेपर आहे. सिंदखेडराजा नगरीत तरुणांसाठी विशेष कार्य करायचंय, अशी भावना सौरभ तायडेची आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीत राज्यातील सर्वात कमी वयाचे तरुण नगराध्यक्ष सौरभ तायडे यच्या या यशाने राज्यातील उच्चशिक्षित तरुणांनीही राजकारणात येऊन देशसेवा आणि राज्याचा विकारा करावा, अशी लोकभावना आता समाजातून उमटत आहे.

घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सौरभ तायडे राजकारणात आला अन् पहिल्याच निवडणूकीत विजयश्री खेचून आणत सर्व रेकाॅर्ड आपल्या नावावर केले. सर्वात तरुण उच्चशिक्षित नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांचा नावावर झाला आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्वात ज्येष्ठ व वयोवृद्ध नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सौरभ तायडेवर विश्वास ठेवून त्याला उमेदवारी दिली आणि एक इतिहासच घडवला. ऐतिहासिक व पुरातन असलेल्या शिंदखेडराजा नगरीचा प्रथम नागरिक बनल्यानंतर सौरभला आता सिंदखेड राजा शहराचा विकास करायचा आहे.