SBI बँकेत मेगा भरती! विविध पदांच्या ९९६ जागांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत व्हीपी वेल्थ (एसआरएम) ची 506 पदे, एव्हीपी वेल्थ (आरएम) 206 पदे आणि कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह 284 पदे भरण्यात येणार आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
बैंकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत व्हीपी वेल्थ (एसआरएम), एव्हीपी वेल्थ (आरएम), कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह (SRM, RM, Customer Relationship Executive Vacancies) पदांच्या एकूण 996 रिक्त जागा भरण्यासाठी (SBI Bank Recruitment) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2025 (Closing date 23 December 2025) आहे. इच्छुक व पात्र उमेदवार SBI च्या अधिकृत संकेतस्थळ https://sbi.bank.in/ वर जाऊन अर्ज करू शकतात.
हेही वाचा - महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत 300 पदांकरिता भरती सुरु
या भरती मोहिमे अंतर्गत व्हीपी वेल्थ (एसआरएम) ची 506 पदे, एव्हीपी वेल्थ (आरएम) 206 पदे आणि कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह 284 पदे भरण्यात येणार आहेत. सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यू उमेदवारांसाठी 750 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आला आहे. तर एससी, एसटी आणि पीडब्ल्यू उमेदवारांसाठी परीक्षा शुल्कात सूट देण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर तर वयोमर्यादा 20 ते 42 दरम्यान आहे.
अर्ज कसा कराल?
उमेदवारांनी सर्वप्रथम SBI च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर होमपेजवरील संबंधित भरती लिंकवर क्लिक करावे. प्रथम नोंदणी करा. नोंदणीनंतर फॉर्म काळजीपूर्वक भरुन सबमिट करा. सबमिट केल्यानंतर अर्ज डाउनलोड करा. भविष्यासाठी अर्जाचा प्रिंटआउट काढून ठेवा.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी मल्टिलेव्हल निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामध्ये एलिजिबिलिटी-आधारित स्क्रीनिंग, मुलाखत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल चेकअप. अशा टप्प्यांचा समावेश आहे. हे सर्व टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनाच नियुक्ती पत्र दिले जाईल.
eduvarta@gmail.com