दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळांतर्गत 717 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू 

या भरती मोहिमे अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 717 जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी उमेदवाराना आधी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. तसेच मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळांतर्गत 717 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू 

एज्युवार्त न्यूज नेटवर्क 

नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ अंतर्गत 'मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस)' (Multi tasking staff) पदांच्या एकूण 717 रिक्त जागा भरण्यासाठी (717 vacancies will be filled) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात (Application process begins) येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२६ (Last date to apply is 15th January) आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ https://dsssb.delhi.gov.in/ वर जाऊन अर्ज करू शकतात. 

हेही वाचा - शिक्षक भरती २०२५ साठी पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाणपत्र नोंदणी प्रक्रिया सुरू

या भरती मोहिमे अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 717 जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी उमेदवाराना आधी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. तसेच मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी वयोमर्यादा ही १८ ते २७ या दरम्यान असणे आवश्यक आहे. आरक्षित वर्गाला भरती नियमाप्रमाणे सवलत देण्यात आली आहे. 

या भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्व प्रवर्गातील विद्यार्थांना १०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्विकारला जाणार आहे. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या भरती संदर्भातील तपशिलवार माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.