दिग्गजांच्या मुलाखतीने पुणे पुस्तक महोत्सवाची सांगता

मराठी अभिनेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग निर्माण झाला तो लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयामुळेअसे दिग्दर्शक महेश कोठारे म्हणाले

दिग्गजांच्या मुलाखतीने पुणे पुस्तक महोत्सवाची सांगता

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे पुस्तक महोत्सवात लेखक मंचावर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते महेश कोठारे , प्रसाद ओक, प्रविण तरडे आणि  राजेश पांडे यांच्या मुलाखतीने रंगत आणली . महेश कोठारे यांच्या 'डॅम इट', प्रसाद ओक यांच्या 'माझा आनंद' व राजेश पांडे यांच्या 'गिनीज गाथा' या पुस्तकांवरील खुमासदार मुलाखत दिग्दर्शक व अभिनेते प्रविण तरडे यांनी घेतली. 

मराठी चित्रपटसृष्टीत दादा कोंडके यांच्यानंतर सुपरस्टार अभिनेत्यांची परंपरा महेश कोठारेंनी सुरू केली. सर्वसामान्य माणसाच्या आवड ओळखून त्यांनी सिनेमानिर्मिती केले, म्हणून यशस्वी दिग्दर्शकांमध्ये ते गणले जाता, असे प्रवीण तरडे यांनी सांगितल.

मराठी अभिनेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग निर्माण झाला तो लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयामुळेअसे दिग्दर्शक महेश कोठारे म्हणाले तर. माझा आनंद' या पुस्तकाचे लेखक व प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते प्रसाद ओक यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या चित्रपटातील आठवणी जागवल्या. एखाद्या प्रसिद्ध राजकीय व्यक्तीची भूमिका साकार करण्याचे शिवधनुष्य होते. त्यात जीव ओतून काम केले. त्यावर हे पुस्तक लिहिले आहे, मी लेखक नाही, पण लिहिण्याची ताकद आनंद दिघे यांच्या भूमिकेतून मिळालीअसे ओक म्हणाले.

पुणे पुस्तक महोत्सव हा मोठ्या लोकसहभागातून यशस्वी झालेला उत्सव आहे. पुणेकरांनी उचलून धरलेला हा उपक्रम लोकजागृतीतून लोकसहभागाकडे नेण्यात इथल्या प्रत्येक वाचकांची कृतिशीलता कामी आली आहे, यातून वेगवेगळे विक्रम होत गेले, त्यातून १२ गिनीज बुक नोंदवले. यातूनच 'गिनीज गाथा' या पुस्तकाची निर्मिती झाली, असे उद्गार पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी काढले.

प्रास्ताविक मेहता पब्लिशिंग हाऊसचे अखिल मेहता यांनी केली तर आभार प्रदर्शन डॉ सुनील भंडगे यांनी केली.