पव्युत्तदर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आजपासून दुसरी प्रवेश फेरी सुरू 

वैद्यकीय समुपदेशन समितीच्या वेळापत्रकानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने राज्य कोट्यातील प्रवेश प्रक्रियेचे दुस्रया फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना 22 डिसेंबर ते 24 डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन पसंतीक्रम भरता येणार आहे. हा पसंतीक्रम भरलेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी 26 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. 

पव्युत्तदर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आजपासून दुसरी प्रवेश फेरी सुरू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (Postgraduate medical courses) प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दुसऱ्या फेरीसाठी सुरुवात होणार झाली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना आजपासून पसंतीक्रम भरता येणार (You can fill in your preferences from today) आहे. तर 26 डिसेंबरला प्रवेशाची अंतिम निवड यादी जाहीर (The selection list will be announced on December 26) केली जाणार आहे. तसेच पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रत्यक्ष वर्ग हे 22 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत.

हेही वाचा - महाविद्यालयीन शिक्षण घेणारी २२ वर्षीय विद्यार्थिनी मोहोळची नगराध्यक्ष

वैद्यकीय समुपदेशन समितीच्या वेळापत्रकानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने राज्य कोट्यातील प्रवेश प्रक्रियेचे दुस्रया फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना 22 डिसेंबर ते 24 डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन पसंतीक्रम भरता येणार आहे. हा पसंतीक्रम भरलेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी 26 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. 

निवड यादीतील विद्यार्थ्यांना 27 ते 30 डिसेंबर या कालावधीत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. दुस्रया फेरीची मुदत 30 डिसेंबरपर्यंत असेल. त्यानंतर 3 जानेवारी 2026 पासून तिस्रया फेरीची सुरुवात होणार आहे. त्यादिवशी दुसया फेरीत घेतलेला प्रवेश रद्द करण्याची संधी विद्यार्थ्यांना असेल. पुढे 4 ते 6 जानेवारीदरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रे सादर करण्याची सुविधा असेल.

7 जानेवारी रोजी गुणवत्ता यादी आणि रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येणार आहे. त्यावेळी विद्यार्थ्यांना 8 ते 10 जानेवारीदरम्यान ऑनलाईन पसंतीक्रम भरता येणार आहे. पसंतीक्रम भरलेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी 12 जानेवारीला जाहीर करण्यात येणार आहे. त्यात निवडलेल्या विद्यार्थ्यांना 12 ते 17 जानेवारीदरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे.