खळबळ उडवणारी बातमी! जवळपास ७० हजार शिक्षकांची प्रमाणपत्रेच गहाळ..
बिहार शिक्षण क्षेत्रातून मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. बिहार राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्तीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे सांगितलं जात आहे. राज्य सरकारने ७२ हजार २८७ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची दक्षता चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
बिहार शिक्षण क्षेत्रातून (Bihar Education Department) मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. बिहार राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्तीत मोठ्या प्रमाणात घोटाळा (Scam in Bihar Education Department) झाल्याचे सांगितलं जात आहे. राज्य सरकारने ७२ हजार २८७ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची दक्षता चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यापैकी सुमारे ६९ हजार शिक्षकांचे प्रमाणपत्र गहाळ (Certificates of 69,000 teachers missing) आहेत. याची दक्षता तपास ब्युरोद्वारे चौकशी केली जात आहे आणि ९० टक्क्यांहून अधिक प्रमाणपत्रे गहाळ आढळल्यानंतर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना पाचारण केलं आहे.
हेही वाचा - आठवीतील विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, पिडितेने त्या अवस्थेतच पोलीस स्टेशन गाठलं..
शिक्षण विभागाच्या मते, २००६ ते २०१५ दरम्यान नियमित शिक्षक म्हणून नियुक्त नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली जात आहे. या प्रमाणपत्रांमध्ये शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक प्रशिक्षण प्रमाणपत्रे (बी.एड., बी.टी.सी.), जात प्रमाणपत्रे, उत्पन्न प्रमाणपत्रे आणि आधारशी संबंधित कागदपत्रे समाविष्ट आहेत. या प्रमाणपत्रांची बोर्ड, विद्यापीठ आणि जिल्हा पातळीवर पडताळणी केली जात आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, सर्वाधिक संशयास्पद प्रमाणपत्रे, ५३ हजार ८९४, हायस्कूल आणि इंटरमिजिएट संस्थांमधून होती. याव्यतिरिक्त, १८ हजार ३९३ शिक्षकांच्या बी.एड., बी.टी.सी., बी.ए., अपंगत्व आणि जात श्रेणी प्रमाणपत्रांची चौकशी केली जात आहे. तिलका मांझी भागलपूर विद्यापीठ, मगध विद्यापीठ बोधगया आणि पाटणा विद्यापीठ यासारख्या बिहारमधील प्रमुख विद्यापीठांमधील १० हजरांहून अधिक प्रमाणपत्रांची तपासणी सुरू आहे. याव्यतिरिक्त, कामेश्वर सिंह संस्कृत विद्यापीठ, जयप्रकाश विद्यापीठ आणि बी. आर. आंबेडकर बिहार विद्यापीठ यासारख्या संस्थांमधील २ हजार प्रमाणपत्रेदेखील संशयास्पद असल्याचे मानले गेले आहे.
कठोर कारवाई करणार : शिक्षणमंत्री
शिक्षणमंत्री सुनील कुमार यांनी सांगितले की, बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई केली जाईल. ज्या शिक्षकांची प्रमाणपत्रे बनावट असल्याचे आढळून येतील, त्यांना तात्काळ बडतर्फ केले जाईल आणि व्याजासह त्यांचे संपूर्ण वेतन वसूल केले जाईल. बिहारमधील ८१ हजार शाळांमध्ये सुमारे ५ लाख ८० लाख शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी ३ लाख ६८ हजार शिक्षक २००६ ते २०१६ दरम्यान नियुक्त झाले. त्यापैकी अंदाजे २ लाख ५० हजार शिक्षक गुणवत्तेवर आधारित परीक्षा उत्तीर्ण होऊन राज्य कर्मचारी बनले. उर्वरित शिक्षकांची सध्या चाचणी सुरू आहे.
eduvarta@gmail.com