आर्टीच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाची निवड यादी जाहीर
मूळ कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांची निवड अंतिम करण्यात येईल, अशी माहिती आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी दिली. निवड झालेल्या उमेदवारांनी https://arti.org.in या आर्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले नाव तपासता येणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (आर्टी) घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण परीक्षेच्या (Competitive Exam Pre-Training Exam) विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मातंग समाजातील विद्यार्थ्यांना (Students from the Matang community) शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आर्टीतर्फे स्पर्धा परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून आर्टीकडून आता गुणवत्ता यादी प्रसिद्ध (Merit list published) करण्यात आली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून या निवडयादीची प्रतिक्षा करण्याच्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल.
हेही वाचा - मुंबईतील पहिल्या 'जेन जी पोस्ट ऑफिस'चे आज उद्धघाटन
यामध्ये यूपीएससी, एमपीएससी, अराजपत्रित गट 'ब' गट 'क', महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, न्यायिक सेवा बैंक, आयबीपीएस, रेल्वे, एलआयसी, कर्मचारी निवड आयोग, पोलिस व सैन्यभरती अशा विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी आर्टीकडून सीईटी सामाईक चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांना मिळालेले प्राप्त गुण, आरक्षणानुसार तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी आर्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ही निवड यादी जाहीर केली असून मूळ कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांची निवड अंतिम करण्यात येईल, अशी माहिती आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी दिली. निवड झालेल्या उमेदवारांनी https://arti.org.in या आर्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले नाव तपासता येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीनुसार सात दिवसाच्या आत कोणताही एक प्रशिक्षण कोर्स निवडावा लागणार आहे. तसेच आर्टीमार्फत कोणत्याही एका प्रशिक्षणासाठी विद्यार्थाची निवड केली जाईल, अशी माहिती सुनील वारे यांनी दिली आहे.
eduvarta@gmail.com