राज्य मंडाळाच्या शाळांना सीबीएसई, ग्लोबल, इंटरनॅशनल नाव असल्यास बेकायदेशीर ठरणार.. 

परवानगी नसतानाही शाळेच्या नावापुढे  'इंटरनॅशनल', 'ग्लोबल', 'सीबीएसई' असे शब्द लावले जातात, असे शिक्षण विभागाच्या तपासणीमध्ये आढळून आले आहे. या प्रकारांमुळे पालक व विद्यार्थ्यांची दिशाभूल होण्याची शक्यता असून समाजावर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. नाव अधिकृत नसेल तर संबंधित शाळांना नाव बदलण्याबाबत सूचना देण्याचा निर्णय राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे.

राज्य मंडाळाच्या शाळांना सीबीएसई, ग्लोबल, इंटरनॅशनल नाव असल्यास बेकायदेशीर ठरणार.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील खाजगी शाळांबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य शिक्षण मंडळाशी संलग्नता (Affiliation with the State Board of Education) असलेल्या अनेक शाळांना 'ग्लोबल', 'इंटरनॅशनल', 'सीबीएसई इंग्लिश मीडियम' ('Global', 'International', 'CBSE' school names) अशी नावे देण्यात आली आहेत. राज्यातील अनेक खासगी शाळांनी पात्रता निकष पूर्ण केले (Eligibility criteria not met) नसल्याचे समोर आले आहे.  शिक्षण मंडळाच्या कायदेशीर बाबीनुसार ही कृती बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करत त्यांच्या नावात बदल करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. अशी माहिती माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक श्रीराम पानझडे (Joint Director Shriram Panzhade) यांनी दिली.

हेही वाचा - मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापक भरतीसाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

परवानगी नसतानाही शाळेच्या नावापुढे  'इंटरनॅशनल', 'ग्लोबल', 'सीबीएसई' असे शब्द लावले जातात, असे शिक्षण विभागाच्या तपासणीमध्ये आढळून आले आहे. या प्रकारांमुळे पालक व विद्यार्थ्यांची दिशाभूल होण्याची शक्यता असून समाजावर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. नाव अधिकृत नसेल तर संबंधित शाळांना नाव बदलण्याबाबत सूचना देण्याचा निर्णय राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांच्या नावांबाबत क्षेत्रीय स्तरावर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

शिक्षण विभागाच्या राज्य प्राधिकरणाकडे नावांबाबत येणाऱ्या अनेक प्रस्तावांमध्ये शाळांची नावे, माध्यम व मंडळ संलग्नता यामध्ये तफावत आढळून येत आहे. काही शाळा राज्य मंडळाशी संलग्न असताना त्यांच्या नावात 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल', 'सीबीएसई' अशा शब्दांचा वापर करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. प्रत्यक्षात अशा शब्दांचा वापर करण्यासाठी संबंधित शाळेची आंतरराष्ट्रीय पातळीवरील संलग्नता असणे आवश्यक आहे. 

यापुढे शाळांच्या नावाबाबत पालक आणि विद्यार्थ्यांवर प्रतिकूल परिणाम होईल अशी नावे आढळल्यास तातडीने ती नावे बदलण्याबाबत सबंधित शाळांना कळविण्यात यावे. अशा शाळांची शिफारस राज्य प्राधिकरणाकडे करण्यात यावी. अशा घटना क्षेत्रीय स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापनाने आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्याव्यात, अशा सक्त सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.