कृषी विद्यापीठाती रिक्त पदे मार्च पर्यंत भरणार; कृषीमंत्र्यांची विधानसभेत माहिती 

वित्त विभागाच्या परवानगीनंतर आकृतिबंधाला तत्काळ मान्यता दिली जाईल. त्यानंतर सचिवस्तरीय बैठक घेऊन भरती प्रक्रिया राबवली जाईल. मार्च २०२६ पर्यंत रिक्त पदांचा भरणा केला जाईल. कृषी विद्यापीठातील भरती प्रक्रिया ही शास्त्रज्ञ सेवा मंडळाच्या माध्यमातून राबवली जाते. या मंडळाचे अध्यक्षपद सध्या रिक्त आहे.

कृषी विद्यापीठाती रिक्त पदे मार्च पर्यंत भरणार; कृषीमंत्र्यांची विधानसभेत माहिती 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

कृषी विभागात नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत पदांचा (Agricultural University Post Recruitment) अनुशेष भरण्यात येणार आहे. कृषी शिक्षणासह संशोधनावर याचा विपरीत परिणाम होत असल्याने मार्च २०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पदभरती (Recruitment will be done by March 2026) केली जाईल, अशी घोषणा खुद्द दस्तूर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Agriculture Minister Dattatreya Bharane) यांनी विधान परिषदेत केली आहे.  

हेही वाचा  - शिष्यवत्तीला कात्री! बार्टी, सारथी, महाज्योतीसह विविध संस्थांच्या योजनेत मोठा बदल..

विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी राज्यातील चारही विद्यापीठातील रिक्त पद भरती संदर्भात लक्षवेधी मांडली. त्याला उत्तर देताना कृषीमंत्री दत्ता भरणे म्हणाले, की कृषी विद्यापीठांमधील भरतीमध्ये अनेक तांत्रिक अडचणी होत्या. त्यामध्ये वित्त विभागाची मंजुरी ही मोठी अडचण आहे. आता वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी पदभरतीसंदर्भातील खर्चाच्या तरतुदीसाठी वित्त विभागाकडून येत्या वीस दिवसांत परवानगी मिळणार असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे पुढील प्रक्रिया सोपी होईल. 

वित्त विभागाच्या परवानगीनंतर आकृतिबंधाला तत्काळ मान्यता दिली जाईल. त्यानंतर सचिवस्तरीय बैठक घेऊन भरती प्रक्रिया राबवली जाईल. मार्च २०२६ पर्यंत रिक्त पदांचा भरणा केला जाईल. कृषी विद्यापीठातील भरती प्रक्रिया ही शास्त्रज्ञ सेवा मंडळाच्या माध्यमातून राबवली जाते. या मंडळाचे अध्यक्षपद सध्या रिक्त आहे. भरती प्रक्रियेत हा अडसर भासू नये, याकरिता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्षांकडे या पदाचा प्रभार तत्काळ प्रभावाने देण्यात येत असल्याची घोषणा भरणे यांनी केली.