जूनमध्ये होणाऱ्या UGC NET 2024 परीक्षेसाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अर्ज

UGC NET जून 2024 परीक्षेची तारीख, अधिसूचना आणि ऑनलाइन फॉर्म एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केले जातील.

जूनमध्ये होणाऱ्या UGC NET 2024  परीक्षेसाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अर्ज

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 विद्यापीठ अनुदान आयोग UGC च्या नेट परीक्षेसंदर्भातील एक मोठी अपडेट समोर आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगचे अध्यक्ष एम.जगदीश कुमार (chairman of University Grants Commission, Mamidala Jagadesh Kumar) यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट टाकून या वर्षी जूनमध्ये होणाऱ्या UGC NET 2024 साठी अर्जाचा फॉर्म एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात (first week of april) प्रसिद्ध होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

जगदीश कुमार यांनी प्रसिध्द केलेल्या पोस्ट नुसार UGC NET जून 2024 परीक्षेची तारीख, अधिसूचना आणि ऑनलाइन फॉर्म एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केले जातील. परीक्षेची तपशीलवार  माहिती बुलेटिन अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर प्रसिद्ध केले जाईल.

दरम्यान यूजीसीने नेट परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे पीएचडी प्रवेशासाठी परवानगी दिली आहे. यूजीसी नेट परीक्षा वर्षातून दोनदा जून आणि डिसेंबरमध्ये घेतली जाते. सध्या UGC NET स्कोअर ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) साठी पात्रता आणि पदव्युत्तर पदवी धारकांसाठी असिस्टंट प्रोफेसर पदावर नियुक्ती म्हणून वापरला जातो. पण आता पीएचडीचे प्रवेशही नेट स्कोअरच्या आधारे मिळणार आहेत.

NET JRF साठी अर्जदाराचे वय ज्या महिन्यात परीक्षा घेतली जाते त्या महिन्याच्या 1 तारखेला 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तर सहाय्यक प्राध्यापक पदासाठी  कोणतीही उच्च वयोमर्यादा नाही. NET परीक्षा केवळ संगणक आधारित चाचणी (CBT) पद्धतीने घेतली जाते. नेट परीक्षेत एकूण दोन पेपर असतात. नेट परीक्षेच्या पेपर 1 मध्ये अध्यापन आणि संशोधनाच्या क्षमतेचे मूल्यांकन केले जाते. तर NET पेपर 2 मध्ये उमेदवाराच्या मुख्य विषयाशी संबंधित प्रश्न विचारले जातात.