पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना करता येणार गोपनीय तक्रारी; केवळ गाईड , सेंटर , प्र-कुलगुरू पाहू शकतील

पीएच.डी. च्या विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दाखल तात्काळ घेतली जाणार असून विद्यार्थी ऑनलाईन पध्दतीने गोपनीय तक्रार करू शकणार आहे.

पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना करता येणार गोपनीय  तक्रारी; केवळ गाईड , सेंटर , प्र-कुलगुरू पाहू शकतील

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे (Savitribai Phule Pune University) पीएच.डी.च्या (PH.D.) विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या नोंदणीपासून ते थेट पदवी मिळेपर्यंतची सर्व माहिती त्यात असणार आहे. त्यातच या पोर्टलामध्ये विद्यार्थ्यांना गोपनीय तक्रारीची सुविधा (Confidential complaint facility for students)उपलब्ध करून दिली जाणार आहे. या तक्रारीची दखल तात्काळ घेतली जाणार असून विद्यार्थी विद्यापीठच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुध्दा ऑनलाईन तक्रार (Pro-Vice Chancellor Online Complaint) करू शकणार आहे.परिणामी पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.

पीएच.डी.साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीसाठी विद्यापीठात यावे लागत होते.पुणे,अहमदनगर व नाशिक या तीनही जिलह्यातील संशोधन केंद्राकडून विद्यार्थ्यांना फारसे सहकार्य मिळत नाही.परिणामी विद्यार्थी थेट विद्यापीठात येतात.त्यामुळेच काही महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांनी विद्यापीठात येण्याची आवश्यकता नाही,अशा आशयाचे एक परिपत्रक विद्यापीठातर्फे प्रसिध्द करण्यात आले होते.त्यातच दोन दिवसांपूर्वी एका पीएच.डी गाईडने आपल्याच विद्यार्थ्यांकडे पीएच.डी.चा थीसिस समबमीट करण्यासाठी 25 हजार रुपयांची  लाच मागीतल्याची घटना समोर आली. त्यामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या व्यक्तींच्या गोपनीय तक्रारी सुध्दा विद्यार्थी करू शकणार आहेत. 

विद्यार्थ्यांच्या तक्रारीसाठी विशिष्ट यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे. विद्यार्थी केवळ आपल्या संशोधन केंद्राकडे गोपनीय तक्रार करू शकतो. तसेच ही तक्रार केवळ संशोधन केंद्राच पाहू शकेल. तर केवळ पीएच.डी.गाईडने तक्रार पहावी असे वाटत असेल तर विद्यार्थी तशी तक्रार सुध्दा करू शकतील.त्याचप्रमाणे केवळ प्र-कुलगुरू यांनीच आपली तक्रार पहावी दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने पाहू नये,अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा असेल तर तशीही सोय सुद्धा विद्यापीठातर्फे करून दिली जाणार आहे.
----------------------------------------

विद्यापीठासाठी प्रत्येक विद्यार्थी महत्त्वाचा असून संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही अडचणी असलीत तर याबाबतच्या तक्रारी विद्यार्थी गोपनीय पध्दतीने करू शकतील. पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या नवीन पोर्टलच्या माध्यमातून या तक्रारी स्वीकारल्या जातील. 

- पराग काळकर, प्र.कुलगुरू , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे