JEE मेन सत्र २ साठी दुरुस्ती विंडो खुली 'या' तारखेपर्यंत करता येतील बदल 

ही सुधारणा विंडो उद्या 7 मार्चपर्यंत खुली राहणार आहे. त्यानंतर पोर्टलवरून लिंक काढून टाकल्याने तुम्हाला कोणताही बदल करता येणार नाही. 

JEE मेन सत्र २ साठी दुरुस्ती विंडो खुली 'या' तारखेपर्यंत करता येतील बदल 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

JEE मेन सत्र 2 (JEE Main Session 2) साठी दुरुस्ती विंडो (Repair window) आज 6 मार्चपासून खुली करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( NTA) jeemain.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर संयुक्त प्रवेश परीक्षेत (Joint Entrance Examination) सुधारणा करण्यासाठी लिंक सक्रिय केली आहे. ही सुधारणा विंडो उद्या 7 मार्चपर्यंत खुली राहणार (Will be open till March 7) आहे. यानंतर पोर्टलवरून लिंक काढून टाकल्याने तुम्हाला कोणताही बदल करता येणार नाही. 
 
ज्या उमेदवारांनी जेईई मेन 2024 सत्र 1 साठी अर्ज केला. परंतु , जेईई (मुख्य) 2024 सत्र 2 साठी नोंदणी करू शकले नाही. तसेच, ज्या उमेदवारांना सत्र 2 साठी नवीन उमेदवार म्हणून अर्ज करायचा आहे, अशा उमेदवारांना या लिंक द्वारे अर्ज करता येईल. तसेच शैक्षणिक पात्रता तपशील (इयत्ता 10 आणि इयत्ता 12), जन्मतारीख, लिंग, श्रेणी, उपश्रेणी/पीडब्ल्यूडी, स्वाक्षरी आणि कागद यामध्ये बदल करण्याची परवानगी उमेदवारांना देण्यात आली आहे.  मात्र, या विंडोमध्ये मोबाईल नंबर, ईमेल, पत्ता, पत्ता (कायमचा आणि वर्तमान), आपत्कालीन संपर्क तपशील आणि उमेदवाराच्या छायाचित्रासह इतर तपशीलांमध्ये बदल करण्याची परवानगी उमेदवारांना नाकारण्यात आलेली आहे. 

दरम्यान, JEE मुख्य सत्र 2 परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली होती. त्यानुसार, उमेदवारांना आदल्या दिवशी म्हणजेच 4 मार्च 2024 पर्यंत फॉर्म भरण्याची संधी देण्यात आली होती. त्याच वेळी आता सुधारणा विंडो एका दिवसानंतर म्हणजे 6 मार्च 2024 पासून उघडली गेली. एप्रिलमध्ये परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी प्रवेशपत्र परीक्षेच्या तीन दिवस आधी जारी केले जातील.