देशात २०० तर महाराष्ट्रात ४ शैक्षणिक चॅनेल सुरू होणार

दीक्षा या ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक गोष्टींची माहिती होत आहे.त्यात पुढील काळात शैक्षणिक चॅनलच्या माध्यमातून भर घातली जाईल.

देशात २०० तर महाराष्ट्रात ४ शैक्षणिक चॅनेल सुरू होणार
Sanjay Kumar secretary of school education government of India

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला (new education policy implementation) तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने देशभरात तब्बल २०० शैक्षणिक चॅनल (educational channel ) सुरू केले जाणार आहेत. त्यात महाराष्ट्रात चार शैक्षणिक चॅनेल सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या विविध विषयांचा अभ्यास करणे सोपे होईल,अशी माहिती केंद्रीय शिक्षण सचिव संजय कुमार (Sanjay Kumar secretary of school education government of India) यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

    पुण्यात होत असलेल्या 'जी 20' च्या निमित्ताने होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत संजय कुमार बोलत होते. यावेळी केंद्रीय उच्च शिक्षण सचिव के संजय मूर्ती आयसरचे संचालक डॉ सुनील भागवत आधी उपस्थित होते. 

  संजय कुमार म्हणाले,नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक मूल शाळेत यावे या दृष्टीने उपाय योजना सुरू आहेत.तसेच विद्यार्थ्याला पायाभूत शिक्षण व संख्याज्ञानची ओळख व्हावी, या दृष्टीने आवश्यक उपक्रम राबविले जात आहेत. दीक्षा या ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक गोष्टींची माहिती होत आहे.त्यात पुढील काळात शैक्षणिक चॅनलच्या माध्यमातून भर घातली जाईल.

 अनेक विद्यार्थ्यांना इयत्ता नववी- दहावी नंतर कोणत्या अभ्यासक्रमांची निवड करावी याबाबत योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे देशभरातील ७ हजार २०० ब्लॉक आहेत. सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत या प्रत्येक ब्लॉक मधील रिसोर्स सेंटरमध्ये एका समुपदेशकाची नियुक्ती केली जाईल. हा समुपदेशक परिसरातील प्रत्येक शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन करेल, असेही संजय कुमार यांनी सांगितले.