कागदपत्रांसाठी विद्यापीठात येण्याची गरज नाही ; सर्वकाही ऑनलाईन, विद्यापीठ होणार 'पेपरलेस'

आगामी काळात विद्यापीठात कागदविरहित प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरुन आवश्यक ते कागदपत्र मिळणार आहेत.

कागदपत्रांसाठी विद्यापीठात येण्याची गरज नाही ; सर्वकाही ऑनलाईन, विद्यापीठ होणार 'पेपरलेस'

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत आता आणखीन एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. आगामी काळात विद्यापीठात कागदविरहित प्रक्रिया (Paperless process) राबवली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरुन आवश्यक ते कागदपत्र मिळणार आहेत. या पेपरलेस ऑनलाइन प्रक्रियेमुळे (Online process) विद्यार्थांची होणारी हेळसांड थांबणार असून ऑनलाईन भरलेला अर्ज जमा करण्यासाठी विद्यापीठात यावे लागणार नाही. 

पुणे विद्यापीठशी संलग्न  विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक कागदपत्रे या पेपरलेस प्रक्रियेमुळे सुलभ आणि वेळेत मिळणार आहेत. याबाबतचा निर्णय नुकत्याच विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना अर्ज केल्यानंतर लवकरात लवकर ट्रान्सक्रिफ्ट प्रमाणपत्र दिले जाणार आहे. 

विद्यापीठाच्या विद्यार्थी सुविधा केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे दिली जातात. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करुन, त्याची मुद्रित प्रत आवश्यक कागदपत्रांसह विद्यापीठीत सादर करावी लागाते . या सर्व प्रक्रियेला वेळ जात असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. त्यामुळे संपुर्ण प्रक्रिया केवळ ऑनलाइन राबवण्यची मागणी विद्यापीठ संघटनांकडून करण्यात आली होती, अखेर त्याला यश मिळाले. 

----------------

विद्यापीठाच्या अधिसभेत झालेल्या चर्चेनंतर परीक्षा सुधार समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन विद्यापीठाकडून आवश्यक उपाय योजना करण्यात आल्या.त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ ऑनालाईन अर्ज करून आवश्यक कागदपत्र प्राप्त करता येतील.

राहुल पाखरे, आधीसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे