Twitter War : स्पर्धा परीक्षा आंदोलकांच्या ट्विटर वॉरमध्ये जितेंद्र आव्हाडांची उडी

जितेंद्र आव्हाड यांनी #परीक्षाकेंद्र_फक्त_TcsION, #पेपरफुटीवरकायदाकरा हे दोन हॅशटॅग वापरून आंदोलनाला पाठिंबा दिला.

Twitter War : स्पर्धा परीक्षा आंदोलकांच्या ट्विटर वॉरमध्ये जितेंद्र आव्हाडांची उडी
MLA Jitendra Awhad

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सरळसेवा भरती (Recruitment) परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठी विशेष कायदा करावा आणि तलाठी भरती परीक्षांचे पेपर केवळ TCS च्या अधिकृत ION परीक्षा केंद्रांवर घेण्यात यावेत, या मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून मंगळवारी ‘ट्विटर वॉर’ (Twitter War) आंदोलन करण्यात आले. या ट्विटर वॉरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) हेही सहभागी झाले.

जितेंद्र आव्हाड यांनी #परीक्षाकेंद्र_फक्त_TcsION, #पेपरफुटीवरकायदाकरा हे दोन हॅशटॅग वापरून आंदोलनाला पाठिंबा दिला. आव्हाड यांच्याप्रमाणेच स्पर्धा परीक्षांशी संबंधित अनेक विद्यार्थी व संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेत दोन्ही मागण्यांना पाठिंबा दिला. याच अधिवेशनात कायदा करण्याची मागणी काही विद्यार्थ्यांनी केली.

Twitter War : सरळसेवा भरतीतील पेपरफुटीविरोधी कायद्यासाठी उद्या ‘ट्विटर वॉर’

आंदोलनाला पाठिंबा देताना आव्हाड यांनी म्हटले की, स्पर्धा परीक्षा आंदोलक विद्यार्थ्यांची ही मागणी अतिशय रास्त आहे. पेपर फुटीवर कायदा करणे हे काळाची गरज आहे. मागील अनेक वर्षापासून हे अवैध प्रकार सुरू आहे. यातून गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार होतो आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणार हे रॅकेट उध्वस्त करण्यासाठी अश्या कायद्याची आवश्यकता आहे.

दरम्यान, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने भरती परीक्षांतील विविध गैरप्रकार समोर आणले आहेत. तसेच आगामी तलाठी भरतीच्या परीक्षेतही असे प्रकार होण्याची शक्यता समितीने व्यक्त केली आहे. सरळसेवा नोकर भरतीत काही टोळ्या वारंवार पेपर फोडत आहे, येणारी नोकर भरती कदाचित शेवटची असेल. इतक्या प्रमाणात नोकर भरती पुन्हा होईल किंवा नाही याची शास्वती नाही. तलाठी तसेच इतर परीक्षांचे पेपर फक्त TCS च्या अधिकृत ION परीक्षा केंद्रांवर घेतले गेल्यास या घोटाळ्यांना काही प्रमाणात आळा बसेल, असे समितीने म्हटले आहे.

कठोर कायदा नसल्याने आरोपी लगेच तुरुंगाबाहेर येतात, म्हणून पेपर फोडी करणाऱ्यांना किमान दहा वर्षाची शिक्षा आणि हा पेपर विकत घेणाऱ्या उमेदवारांना किमान पाच वर्षाचा तुरुंगवास असलेला नवीन कायदा शासनाने करावा, या मागणीसाठी ट्विटर वॉर आंदोलन असल्याने सहभागी होण्याचे आवाहन समितीने केले होते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD