NEP 2020 : नव्या शैक्षणिक धोरणातील महत्वाचे मुद्दे एका क्लिकवर

धोरणामुळे KG to PG पर्यंतच्या शिक्षणपध्दतीत काय बदल होणार, परीक्षा कशा होतील, अभ्यासक्रमात नव्याने काय शिकायला मिळणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

NEP 2020 : नव्या शैक्षणिक धोरणातील महत्वाचे मुद्दे एका क्लिकवर
National Education Policy 2020

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रात येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सोमवारी पुण्यात दिली. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे धोरण नेमके काय आहे, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. या धोरणामुळे KG to PG पर्यंतच्या शिक्षणपध्दतीत (Education System) काय बदल होणार, परीक्षा कशा होतील, अभ्यासक्रमात नव्याने काय शिकायला मिळणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. याविषयी काही महत्वाच्या मुद्द्यांची माहिती आम्ही आपल्याला देत आहोत. (National Education Policy 2020)   

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा, इयत्ता १२ वी साठी सेमिस्टर प्रणाली, विज्ञान, मानवविकास आणि वाणिज्य विषयांमध्ये आंतरविद्याशाखीय शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य, इयत्ता २ री पर्यंत परीक्षाच नाही, अशा काही महत्वपूर्ण शिफारशांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण नुसार राष्ट्रीय अभ्यासक्रम संरचना (NCF) करण्यात आली आहे. त्यामुळे त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. काय आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, याला एवढे महत्व का आहे, हे जाणून घेऊयात.

३४ वर्षानंतर आणि २१ व्या शतकातील पहिली शैक्षणिक सुधारणा २०२० मध्ये करण्यात आली. २९ जुलै २०२० रोजी विद्यमान भारतीय शिक्षण पद्धतीत अनेक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने मंत्रिमंडळाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मान्यता दिली. या धोरणानुसार पहिला आराखडा नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

NCF मधील शिफारशींच्या अंलबजावणीमुळे भारतातील शालेय व्यवस्थेची मोठी पुनर्रचना होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भारतातील शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणून सर्वसमावेशक धोरण अवलंबणे, हा NEP चा प्रमुख उद्देश आहे. ५+३+३+४ या सूत्रावरून NEP 2020 अंतर्गत प्रस्तावित भारतातील शालेय शिक्षणाच्या नवीन संरचनेमधील बदलांविषयी कल्पना येऊ शकते.

हेही वाचा : मेडिकल, इंजिनिअरिंग शिका आता मराठीतून

NEP  मधील काही महत्वाचे मुद्दे –

  • वय वर्ष ५ ते ८ या वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये संज्ञानात्मक, सामाजिक, भावनिक आणि सर्जनशील कौशल्ये विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. तसेच खेळ-आधारित आणि कृतीआधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
  • वय वर्ष ८ ते ११ या विद्यार्थ्यांसाठी NEP धोरणांतर्गत प्रकल्प-आधारित आणि अनुभवात्मक शिक्षणावर भर राहील. त्यामध्ये वैचारिक जडणघडण, समस्या सोडवणे आणि संवाद कौशल्ये विकसित करणे आदींचा अंतर्भाव केला आहे.
  • पूर्व माध्यमिक स्तरातील ११ ते १४ या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी विषय-आधारित शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. यामध्ये संकल्पनात्मक समज आणि विश्लेषणात्मक कौशल्ये विकसित करण्याचा प्रयत्न आहे.
  • १४ ते १८ या वयोगटातील माध्यमिक स्तरातील विद्यार्थ्यांसाठी बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. यामध्ये व्यावसायिक आणि शैक्षणिक दोन्ही कौशल्ये विकसित करता येतील.
  • NEP 2020 चे उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करून अधिक लवचिक आणि सर्वसमावेशक शिक्षण प्रणाली प्रदान करणे आहे. या धोरणात शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण आणि विकास आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही भर देण्यात आला आहे.