Nobel Prize : कोणत्या संशोधनासाठी मिळाला वैद्यकशास्त्रातील यंदाचा नोबेल पुरस्कार?

नोबेल समितीचे सचिव थॉमस पर्लमन यांनी ही घोषणा केली. न्यूक्लिओसाइड आधारित बदलांशी संबंधित शोधांसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Nobel Prize : कोणत्या संशोधनासाठी मिळाला वैद्यकशास्त्रातील यंदाचा नोबेल पुरस्कार?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

जगभरात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची (Nobal Prize) घोषणा करण्यास सोमवारपासून (दि. २) सुरूवात झाली आहे. यावर्षीचे वैद्यकशास्त्रातील (Medical) नोबेल पुरस्कार हंगेरियाचे कॅटालिन कॅरिको (Katalin Karikó) आणि अमेरिकेचे ड्र्यू वेइसमन (Drew Weissman) या शास्त्रज्ञांना घोषित झाला आहे. mRNA कोव्हिड लस बनवणारे तंत्रज्ञान विकसित करण्यात या जोडीने केलेल्या संशोधनाला हा पुरस्कार देण्यात आला आहे.

 

नोबेल समितीचे सचिव थॉमस पर्लमन यांनी ही घोषणा केली. न्यूक्लिओसाइड आधारित बदलांशी संबंधित शोधांसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या याच शोधामुळे कोविड-19 विरुद्ध प्रभावी ठरलेली मेसेंजर आरएनए (mRNA) लस विकसित करण्यात यश मिळाले आहे.  

Mangalyaan-2 Mission : 'इस्त्रो'कडून मंगळ ग्रहावर दुसऱ्यांदा यान पाठविण्याची तयारी

 

कॅरिको आणि वेइसमन यांच्या संशोधनामुळे mRNA ही लस आपल्या रोगप्रतिकार शक्तीसाठी कशा पद्धतीने काम करते, याबाबत माहिती मिळवण्यास मदत झाली आहे. त्यांच्या या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील दखल घेण्यात आली होती. दोघांनाही हा पुरस्कार विभागून देण्यात आला. 

 

mRNA तंत्रज्ञानाच्या आधारे आता इतर आजार आणि कर्करोगावरही संशोधन केले जात आहे. रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी mRNA नावाच्या अनुवांशिक कोडचा रेणू वापरला जातो. विषाणूचा हल्ला झाल्यानंतर त्याला प्रतिकार करण्यासाठी शरीरामध्ये त्यानुसार बदल होऊन प्रतिकारशक्ती वाढते.

 

दरम्यान, वर्षभरात मानवतेसाठी महत्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना  नोबेल पुरस्काराने गौरविण्यात येते. हा पुरस्कार अनेक क्षेत्रांमध्ये दिला जातो. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य यासारख्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आज (दि. ३) भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा केली जाणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j