शाळेत गणित अन् विज्ञानाला पर्यायी विषय हवेत का?

राज्यातील माध्यमिक शाळेत शिकणारे विद्यार्थी विज्ञान आणि गणिताच्या मूलभूत प्रश्नांची साधी उत्तरे देऊ शकत नाहीत, हे सर्वेक्षणाने दाखवून दिले होते. दर तीन ते चार विद्यार्थ्यांमागे एका विद्यार्थ्यांची ही अवस्था होती.

शाळेत गणित अन् विज्ञानाला पर्यायी विषय हवेत का?
Mathematics and Science

णित (Mathematics) आणि विज्ञान (Science) हे विषय आजही विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरतात. परिणामी, माध्यमिक स्तरावर पोहोचूनही या दोन विषयांमध्ये ते सरासरी पातळी देखील गाठू शकत नाहीत. ही स्थिती एकीकडे तर दुसरीकडे गेल्या दहा वर्षात सुमारे सव्वाशे मराठी शाळा (Marathi Schools) बंद पडण्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात समान धागा आहे तो म्हणजे विषयांची सक्ती, विषयांची भीती आणि नापास होण्याचे दडपण.

राज्यातील माध्यमिक शाळेत (Schools In Maharashtra) शिकणारे विद्यार्थी विज्ञान आणि गणिताच्या मूलभूत प्रश्नांची साधी उत्तरे देऊ शकत नाहीत, हे सर्वेक्षणाने दाखवून दिले होते. दर तीन ते चार विद्यार्थ्यांमागे एका विद्यार्थ्यांची ही अवस्था होती. शालेय पातळीवर या मूळ विषयाकडे दुर्लक्ष होत आहे. मला गणित विषय समजत नाही, विज्ञान विषयही मला कठीण वाटतो, असे इयत्ता सहावी-सातवीतील विद्यार्थी म्हणतात. त्यांचे पालक मात्र या सगळ्यांचे खापर एकमेकांवर फोडत असतात. मुलांच्यासाठी वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे शाळेची संपूर्ण जबाबदारी आहे, असे म्हणत त्यातच वेळ वाया घालवतात आणि मुलांकडे दुर्लक्ष करतात. अशा भांडणांचा मुलांवर नेहमीच नकारात्मक परिणाम होतो.

शैक्षणिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा. https://eduvarta.com/

समस्या सोडवण्याऐवजी पालकांचे या विषयावरून वाद होतात. त्याचा अतिरिक्त ताण विद्यार्थ्यांवर येतो परंतु कोणत्याही माध्यमांची किंवा कोणत्याही बोर्डाची शाळा असो गणित आणि विज्ञान या विषयाचा धसका घेतलेले विद्यार्थी प्रत्येक वर्गात दर दहा विद्यार्थ्यांमागे किमान चार तरी असतात. खरे तर काही बोर्डांनी पर्यायी विषय दिलेले असतात. परंतु ते विषय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जात नाहीत आणि याची पालकांनाही कल्पना नसते. मानसोपचार तज्ञांच्या मते, हा प्रश्न केवळ सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा नाही तर शैक्षणिक अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांचाही आहे.

काही शाळा लर्निंग डिसेबिलिटी किंवा डिस्लेक्सिया असलेल्या मुलांना दहावीच्या वर्षात विज्ञान व गणित विषयाची सक्ती का करतात? सर्व शाळात हे विशेष शक्तीचे असतात. पर्यायी विषय त्यांना उपलब्ध करून देण्याची इच्छा दिसत नाही. ही खेदाची बाब आहे. विषयांच्या बाबतीत जी सक्ती केली जाते, त्याच्याशी जुळवून घेताना विशेष मुलांची आणि पालकांची प्रचंड मानसिक शारीरिक तसेच आर्थिक दमछाक होते. अशा मुलांना बाकीच्या विषयात चांगले गुण मिळतात, परंतु गणित, विज्ञान विषयामुळे अडचणी येऊन मागे खेचले जातात.

अशी झाली शैक्षणिक धोरणांची ऐतिहासिक वाटचाल; पुराण ते आजचे धोरण

आपल्याकडे या विषयांना अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे ज्यांना यामध्ये कमी गुण मिळतात ते हुशार असले तरी मागे राहतात. मुळातच ही मानसिकता बदलायला हवी. आता ती थोडेफार बदलते आहे, पण अजून बराच पल्ला गाठायचा आहे. चित्रकला भाषा यांना पर्यायी विषय दिल्यास चालते. परंतु गणित आणि विज्ञान विषयाला पर्याय कसा द्यायचा, ते तर सक्तीचे विषयच असले पाहिजेत ना.

देशातील काही बोर्डांनी विद्यार्थी स्नेही धोरण अवलंबत इतर विषयांचे पर्याय सुद्धा दिलेले आहेत. दोन्हींपैकी एक किंवा गरज वाटल्यास गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय घेण्याची मुबाही आहे. एवढेच नाही तर पर्यायी विषयाची यादी सुद्धा मोठी आहे. त्यात बरेच वैविध्यही आहे, पण गणित आणि विज्ञान विषय बदलण्याची पटकन मानसिकता होत नाही. त्याला अनेक कारणे आहेत. दैनंदिन जीवनातील या दोन विषयांचे अनन्य साधारण महत्व, व्यावहारिक उपयोग इत्यादी.

‘स्त्री सक्षमीकरणाचा वसा’ - महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था

अनेक शाळांमध्ये १०० टक्के दहावीचा निकाल लागावा म्हणून अशा मुलांना नववीत ठेवतात. परंतु त्यांच्या मानसिकतेमुळे काही वेळा त्यांना पुन्हा संधी दिल्यावर सुद्धा ते हे विषय पूर्ण करू शकत नाहीत. आयुष्यात गणित विषयाला खूप महत्त्व आहे, असे अनेक लोक सांगतात पण इतर विषयांमध्ये चांगली कामगिरी करणारे हे विद्यार्थी केवळ गणित आणि विज्ञान या दोन विषयांच्या भीतीमुळे इतर विषयात सुद्धा मागे पडू शकत लागतात. परिणामी, आत्मविश्वासावर परिणाम होतो आणि मग नववीत नापास होतात. त्यामुळे काही वेळा शाळा सोडावी लागते. हेही खरे की, शैक्षणिक अक्षमता असलेल्या मुलांना गणित आणि विज्ञान विशेष गाळतात.

प्रागतीक विचारांची कास धरणाऱ्या बोर्डाने विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या बाबतीत पुरेपूर न्याय मिळेल व त्यांच्या मूलभूत हक्कांवर कोणी गदा आणणार नाही याची खात्री दिली पाहिजे. विद्यार्थी स्नेही धोरण केवळ कागदावर लिहून चालणार नाहीत, तर त्यांची व्यवस्थित आणि विना त्रुटी अंमलबजावणी होणे, ही काळाची गरज आहे.

- सुनिता सपाटे, शिक्षिका, भारत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo