NEET UG 2024 चा पेपर फुटला? NTA कडून स्पष्टीकरण

NTA ने चुकीच्या प्रश्नपत्रिकेतील त्रुटी मान्य केल्या आहेत. मात्र, पेपर फुटल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे.

NEET UG 2024 चा पेपर फुटला? NTA कडून स्पष्टीकरण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) रविवार  (दि.५ )  राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा अंडरग्रेजुएट (NEET UG 2024 )देशभरातील 557 शहरांमध्ये आणि परदेशातील 14 शहरांतील परीक्षा केंद्रांवर आयोजित केली. मात्र, यावेळी प्रश्नपत्रिका लीक (Question paper leak) झाल्याचा दावा सोशल मीडिया करण्यात आला. यावर NTA कडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. NTA ने चुकीच्या प्रश्नपत्रिकेतील त्रुटी मान्य केल्या आहेत. मात्र, पेपर फुटल्याच्या वृत्ताचे खंडन (Denial of paper leak report)केले आहे.

राजस्थानमधील एका परीक्षा केंद्रावर हिंदी माध्यमाच्या विद्यार्थीना इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली होती. NTA ने या चुकीच्या प्रश्नपत्रिकेतील त्रुटी मान्य केल्या आहेत.  जिथे पेपर लीक झाल्याचा दावा केला जात आहे; तो पूर्णपणे खोटा असून तो केवळ खळबळजनक बातम्यांसाठी केला जात आहे. उच्च माध्यमिक आदर्श विद्या मंदिर (मुलींची), सवाई माधोपूर येथे एका वेगळ्या घटनेत विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका चुकून देण्यात आली आणि पर्यवेक्षक चूक सुधारत असताना, काही विद्यार्थी जबरदस्तीने प्रश्नपत्रिका घेऊन परीक्षा हॉलमधून बाहेर पडले, असे NTA कडून सांगण्यात आले आहे. 

नियमानुसार विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर प्रश्नपत्रिका घेऊनच हॉलमधून बाहेर पडण्याची परवानगी आहे. मात्र,  काही विद्यार्थी जबरदस्तीने बाहेर पडले. त्यामुळे दुपारी चारच्या सुमारास प्रश्नपत्रिका इंटरनेटवर प्रसारित झाली, मात्र तोपर्यंत देशभरातील इतर सर्व केंद्रांवर परीक्षा सुरू झाली होती. त्यामुळे, NEET UG प्रश्नपत्रिका कोणतीही लीक झालेली नाही, NTA कडून असे सांगण्यात आले आहे.

यावर्षी, NEET UG साठी विक्रमी 23 लाख उमेदवारांनी नोंदणी केली. ज्यामध्ये 10 लाखांहून अधिक पुरुष विद्यार्थी, 13 लाखांहून अधिक मुली आणि 24 विद्यार्थ्यांनी ‘थर्ड जेंडर’ श्रेणी अंतर्गत नोंदणी केली. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 3 लाख 39 हजार 125 उमेदवारांची नोंदणी झाली आहे, त्यानंतर महाराष्ट्रातून 2 लाख 79 हजार 904 नोंदणी करण्यात आली आहे.