UPSC : CDS 1 चा अंतिम निकाल जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) CDS 1 चा अंतिम निकाल जाहीर केला

UPSC : CDS 1 चा अंतिम निकाल जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) CDS 1 चा अंतिम निकाल जाहीर (Final result announced)केला आहे. अंतिम निकाल अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर PDF स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवारांची नावे व रोल क्रमांक अंतिम यादीत नोंदवले जातात. या यादीत ज्या उमेदवारांची नावे नमूद केली आहेत ते पुढील टप्प्यासाठी पात्र मानले जातील.

CDS बरोबरच, UPSC द्वारे भारतीय आर्थिक सेवा (IES) आणि भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा (ISS) चे अंतिम निकाल देखील जाहीर करण्यात आले आहेत. सर्व भरतीचे निकाल पीडीएफ स्वरूपात जाहीर झाले आहेत. उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अंतिम निकाल डाउनलोड करू शकतात.

एकत्रित संरक्षण सेवा (CDS) परीक्षेद्वारे एकूण ३४१ पदांची भरती केली जाईल. यापैकी इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) च्या १०० पदांवर, इंडियन नेव्हल अकादमीच्या (INA) २२ पदांवर, हवाई दलाच्या ३२ पदांवर, ऑफिसर ट्रेनिंग अकादमीच्या (OTA) १७० पदांवर आणि OTA च्या १७ पदांवर नियुक्त्या करायच्या आहेत. याशिवाय,  IES भरतीद्वारे एकूण १८ पदांवर नियुक्त्या केल्या जातील आणि  ISS द्वारे ३३ रिक्त जागा भरल्या जातील.