SPPU: प्रवेश पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर; ॲडमिशन पुढच्या आठवड्यात

या परीक्षेसाठी 14 हजार 641 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता.

SPPU: प्रवेश पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर; ॲडमिशन पुढच्या आठवड्यात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) विविध विभागांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश पूर्व परीक्षेचा निकाल (Result of pre-admission examination) जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर (official website) त्यांना मिळालेले गुण (Marks) पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.मात्र, प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांना  आणखी एक आठवडा वाट पहावी लागणार आहे. परिणामी विद्यापीठातील प्रवेश जुलै महिन्यात (University Admission July Month) सुरू होणार आहेत.

पुणे विद्यापीठातील विविध विभागातील प्रवेशासाठी प्रवेश पूर्व परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी 14 हजार 641 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यानुसार विद्यापीठातर्फे परीक्षा ( EXAM) घेण्यात आली. विद्यापीठाने परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करून जाहीर केला आहे. आता विद्यापीठातर्फे विभागातील उपलब्ध जागांचा विचार करून आरक्षण निहाय गुणवत्ता यादी (Merit list according to reservation) तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून पुणे विद्यापीठातील विविध विभागांमधील प्रवेश प्रक्रिया (Admission process) सुरु होणार आहे.

विद्यापीठातील विभागात प्रवेश मिळण्याची अनेक विद्यार्थ्यांची इच्छा असते. मात्र, गेल्या पाच-सहा वर्षांपासून कला शाखेच्या काही विभागांचे प्रवेश कमी झाले आहेत. मात्र, यावर्षी प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चांगली आहे. त्यामुळे प्रवेशात वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यात काही विभागात विद्यार्थी केवळ वसतीगृह मिळावे, या उद्देशाने प्रवेश घेतात. मात्र, त्यावरही विद्यापीठाने नियंत्रण आणले आहे. परंतु, गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.