NEET UG : व्यवहारासाठी सांकेतिक भाषा; 5 लाखात वाढवले गुण , 50 हजार ॲडव्हान्स

गुण वाढवण्याच्या नावाखाली 5 लाख रुपयांचे आमिष दाखवून फसवत होते. यासाठी ही टोळी विद्यार्थ्यांकडून 50 हजार रुपये ॲडव्हान्स घ्यायची.

NEET UG : व्यवहारासाठी सांकेतिक भाषा;  5 लाखात वाढवले गुण , 50 हजार ॲडव्हान्स

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

NEET UG परीक्षेतील गैरप्रकारासंदर्भात पोलिसांनी महाराष्ट्रातून चार जणांना ताब्यात घेतले. यापैकी संजय जाधव (Sanjay Jadhav) आणि जलील पठाण(Jalil Pathan) या दोन शिक्षकांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असून त्यांचाकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. न्यायाधीश एम.एन.चव्हाण (M.N. chavhan) यांनी सुनावणी दरम्यान आरोपींना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी (Police custody) सुनावली आहे.    

परीक्षेत गुण वाढवून देण्यासाठी (To increase marks in exams) चार जण मिळून रॅकेट (racket) चालवत होते. हे रॅकेट विद्यार्थ्यांना गुण वाढवण्याच्या नावाखाली 5 लाख रुपयांचे आमिष दाखवून फसवत होते.यासाठी ही टोळी विद्यार्थ्यांकडून 50 हजार रुपये ॲडव्हान्स घ्यायची.

आरोपींनी विद्यार्थ्यांशी बोलण्यासाठी सांकेतिक भाषेचा (sign language) वापर केला होता. आरोपी एरन्ना कोंगलवार यांच्या घराची पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याकडून ६ मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यात सांकेतिक भाषेचा वापर केल्याचा पुरावा आढळून आला आहे. त्यांचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

या सर्व आरोपींचे संबंध दिल्लीतील गंगाधर मुंडे यांच्याशी जोडले जात आहेत. आरोपी संजय जाधव आणि जलील पठाण हे विद्यार्थ्यांकडून पैसे गोळा करून कोंगलवारपर्यंत पोहोचवत असत. कोंगलवार ही रक्कम दिल्लीतील गंगाधर मुंडे यांना पाठवत असे. या तिन्ही आरोपींचा गंगाधर मुंडे यांच्याशी संबंध आल्याने आता त्यांच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले आहे.