UGC NET प्रश्नपत्रिका फोडणारा निखिल पोलिसांच्या ताब्यात; स्वत: करत होता परीक्षेची तयारी 

निखिलने यूजीसी नेटची परीक्षाही दिली होती. कोटा येथे राहून तो परीक्षेची तयारी करत होता.

UGC NET प्रश्नपत्रिका फोडणारा निखिल पोलिसांच्या ताब्यात; स्वत: करत होता परीक्षेची तयारी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

UGC NET पेपर फूटी प्रकरणी CBI पथकाने मोठी कारवाई केली आहे. टेलिग्राम वर UGC NET ची प्रश्नपत्रिका लीक करणार्‍या व्यतीला (Question paper leaker)उत्तर प्रदेशातील कुशीनगर (Kushinagar in Uttar Pradesh)येथून ताब्यात घेतले आहे. निखिल असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सीबीआयचे पथक (CBI team)पडरौना पोलीस ठाण्यात निखिलची चौकशी करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निखिलने यूजीसी नेटची परीक्षाही दिली होती. कोटा येथे राहून तो परीक्षेची तयारी करत होता. निखिलने टेलीग्रामवर UGC NET पेपरचे काही उतारे पोस्ट केले होते.

वास्तविकत: 18 जून रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) UGC NET परीक्षा पेन-पेपर मोडमध्ये (OMR शीट) घेतली होती, परंतु, ती 19 जून रोजी रद्द करण्यात आली . 19 जून 2024 रोजी, विद्यापीठ अनुदान आयोगाला (UGC) गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या नॅशनल सायबर क्राइम थ्रेट ॲनालिटिक्स युनिट (NCTAU) कडून परीक्षेसंदर्भात काही इनपुट प्राप्त झाले. हे इनपुट परीक्षेतील अनियमिततेबाबत होते. त्यानंतर शिक्षण मंत्रालयाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. 

नेट परीक्षा रद्द करण्यात आली असून या लवकरच परीक्षची पुढील तारीख जाहीर केली जाणार असल्याचे एनटीएतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, यूजीसी नेट नंतर सीएसआयआर- नेट परीक्षाही स्थगित करण्यात आली.तसेच नीट पीजी परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे.त्यात आता पेपर फुटीचे धागे बिहारसह महाराष्ट्रात येऊन पोहचले आहेत.