शाळेच्या आवारात ५ वर्षीय मुलाचा मृत्यू, संतप्त गावकऱ्यांनी शाळाच पेटवली.. 

पटना येथील एका खाजगी शाळेच्या आवारातील एका टाकीत गुरुवारी संध्याकाळी पाच वर्षांचा मुलगा मृतावस्थेत आढळून आला.

शाळेच्या आवारात ५ वर्षीय मुलाचा मृत्यू, संतप्त गावकऱ्यांनी शाळाच पेटवली.. 
Patana school

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पटना येथील एका खाजगी शाळेच्या (A school in Patna) आवारातील एका टाकीत गुरुवारी संध्याकाळी पाच वर्षांचा मुलगा मृतावस्थेत आढळून (A five-year-old boy was found dead) आला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल (A case of murder has been registered) करण्यात आला असून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पटना पोलिसांनी दिली. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको करून शाळा पेटवून (Citizens set the school on fire) दिली. शाळेचा काही भाग जाळला असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणण्यात यश आले. 

मयत बालक सुमारे पाच वर्षांचा असून, गुरूवारी सकाळी तो सहा वाजता शाळेत गेला. शाळेच्या अतिरिक्त प्रशिक्षणानंतर तो दुपारी २ वाजता घरी परतणार होता. दुपारी ३ वाजेपर्यंत तो घरी न परतल्याने आई-वडील व नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला. सायंकाळी सातच्या सुमारास पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. 

शाळेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगा एका दिशेने जात असल्याचे आणि परत येत नसल्याचे दिसून आल्यानंतर शाळा प्रशासनाने शोध सुरू केला आणि त्याचा मृतदेह वर्ग खोल्याजवळील सांडपाणी नाल्यात सापडला. काही विद्यार्थ्यांचा हवाला देत पोलिसांनी सांगितले की, तो मुलगा स्लाइडवरून खाली पडल्यानंतर बेशुद्ध पडला होता. पण त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याऐवजी शाळा प्रशासनातील काही लोकांनी मुलगा मेला आहे,असे समजून त्याचा मृतदेह वर्गाजवळील नाल्यात टाकला, असे मुलाच्या पालकांनी पोलीस तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी सुमारे 50 लोकांनी जमून शाळेचा काही भाग पेटवून दिला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करू. तसेच  स्थानिक लोकांविरुद्ध जाळपोळ आणि कायदा व सुव्यवस्थेचा भंग केल्याबद्दल दुसरी एफआयआर देखील दाखल करत आहोत, असे पाटणाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा यांनी सांगितले.