मंत्री महोदय, मुलांना तरी खोटे आश्वासन देऊ नका; मंत्री केसरकरांवर आपची टीका

महाराष्ट्रामध्ये एकूण ६४ लाख २८ हजार मुले शिकत असून त्यांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. काही ग्रामीण भागात एक गणवेश दिला गेला आहे.

मंत्री महोदय, मुलांना तरी खोटे आश्वासन देऊ नका; मंत्री केसरकरांवर आपची टीका
School Education Minister Deepak Kesarkar

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील सर्व मुलांना गणवेश (School Uniform), शूज आणि मोजे दिले जाणार अशी जाहिरात सरकारने (Maharashtra Government) केली. पण ही जाहिरात म्हणजे जुमला असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे (AAP) मुकुंद किर्दत (Mukund Kirdat) केला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनीही याबाबत घोषणा केली आहे. पण आजपर्यंत पुण्यासह अनेक शहरांमध्ये मुलांना एकही गणवेश मिळालेला नाही. त्यामुळे मुलांना तरी खोटी आश्वासने देऊ नका, अशी टीका किर्दत यांनी केली.

महाराष्ट्रामध्ये एकूण ६४ लाख २८ हजार मुले शिकत असून त्यांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. काही ग्रामीण भागात एक गणवेश दिला गेला आहे. आज पुण्यासह अनेक शहरांमध्ये मुलांना एकही गणवेश मिळालेला नाही. शिंदे फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने सर्वत्र दिलेल्या जाहिरातींमध्ये शाळेमधील सर्व मुलांना दोन गणवेश व शूज, मोजे मोफत दिले जाणार असल्याची घोषणा केली गेली. तसे मंत्र्यांनी ट्विटही केले. परंतु पुण्यामधील शाळांमध्ये अजूनही यासाठीचा निधी आलेला नाही, असे किर्दत यांनी सांगितले.

डीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी यंदाही फिरवली पाठ; केवळ १४ हजार अर्ज

मुले मागच्या वर्षीचाच गणवेश वापरत आहेत. दुसरी बाब म्हणजे हा गणवेश शाळेच्या व्यवस्थापनाने ठरवायचा असून दुसरा गणवेश स्काऊट साठीचा निळा रंगातला असून त्याबाबतही कुठलाच निधी आलेला नाही. त्यामुळे सध्या मुलांकडे ऐन पावसाळ्यामध्ये जुनाच ड्रेस वापरण्याची वेळ आलेली आहे. ज्यांचे जुने ड्रेस हे उंचीला अपुरे, छोटे आणि फाटले आहेत त्यांच्या वरती अडचणीची परिस्थिती उद्भवली आहे, अशी दावा किर्दत यांनी केला आहे.

त्याच वेळेस हे ड्रेस सर्व मुलांना दिले जाणार अशी घोषणा केलेली असताना प्रत्यक्षात दुर्बल घटकात नसलेल्या मुलांना हा गणवेश देण्याचे कोणतेही नियोजन अथवा आदेश आलेला नाही. त्यामुळे या नुसत्या हवेतल्याच घोषणा आहेत का, असा सवाल मुकुंद किर्दत यांनी विचारला आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD