SSC-HSC बोर्डाच्या अध्यक्षपदी IAS अधिकारी; त्रिगुण कुलकर्णी यांच्याकडे जबाबदारी 

त्रिगुण कुलकर्णी हे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे उपमहासंचालक म्हणून कार्यरत होते.आता ते बोर्डाच्या अध्यक्षपदाची जबादारी सांभाळणार आहेत.  

SSC-HSC बोर्डाच्या अध्यक्षपदी IAS अधिकारी; त्रिगुण कुलकर्णी यांच्याकडे जबाबदारी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

SSC-HSC BOARD: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) अध्यक्षपदी सनदी अधिकारी त्रिगुण कुलकर्णी (Trigun Kulkarni) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राज्य मंडळाच्या अध्यक्षपदी प्रथमच एका आयएएस अधिकाऱ्याची (First time IAS officer as President) नियुक्ती करण्यात आल्यामुळे शिक्षण विभागात चर्चेला उधाण आले आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी शरद गोसावी यांच्याकडे होती. परंतु, तीन वर्षांचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांची बदली प्राथमिक शिक्षण संचालक पदी करण्यात आली आहे. सुमारे वर्षभरापासून राज्य मंडळाचे अध्यक्ष पद रिक्त होते. शरद गोसावी यांच्याकडे बोर्डाच्या अध्यक्षपदाची अतिरिक्त जबाबदारी होती. त्रिगुण कुलकर्णी हे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे उपमहासंचालक म्हणून कार्यरत होते.आता ते बोर्डाच्या अध्यक्षपदाची जबादारी सांभाळणार आहेत.  

गेल्या काही वर्षांपासून शिक्षण विभागात आयएएस अधिकाऱ्यांची बदली होत असल्यामुळे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रथमतः बालचित्रवाणीचे संचालक पद रद्द करून शिक्षण आयुक्त पद तयार करण्यात आले.या पदी आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या प्रमुख पदी सुद्धा गेल्या काही वर्षांपासून महसूल विभागातील अधिकारी नियुक्त केले जात आहेत. तसेच राज्य परीक्षा परिषदेच्या प्रमुख पदी सुद्धा महसूल विभागातील अधिकारी कामकाज पाहत आहेत. त्यामुळे यापुढील काळात शिक्षण विभागाचे कामकाज आयएएस अधिकारी राहणार की काय ? असा सवाल उपस्थित होत आहे. 

सध्या प्राथमिक शिक्षण संचालक पदी शरद गोसावी कार्यरत आहेत. तर माध्यमिक शिक्षण संचालक म्हणून महेश पालकर कामकाज पाहत आहेत. योजना विभागाची जबाबदारी कृष्णकुमार पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे. तर बालभारतीच्या प्रमुख पदी अनुराधा ओक या काम पाहत आहेत. उर्वरित सर्व पदांवर आयएएस अधिकारी कामकाज पाहत असल्याचे दिसून येत आहे.