केंद्रीय व नवोदय विद्यालयात ९ हजाराहून अधिक पदांसाठी भरती सुरू; तात्काळ अर्ज करा
तब्बल 9 हजार 126 जागांसाठी ही भरती राबवली जात आहे. त्यात प्राथमिक शिक्षकांची 3 हजार 365 पदे असून 1 हजार 115 पदे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केंद्रीय विद्यालय संघटन (Kendriya Vidyalaya Sangathan)आणि नवोदय विद्यालय संघटन (Navodaya Vidyalaya Organization)यांनी विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध (Advertised for recruitment)केले असून 14 नोव्हेंबर पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.पात्र, उमेदवारांना येत्या 4 डिसेंबर पर्यंत विविध पदांसाठी अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी https://kvsangathan.nic.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयाशी निगडीत विविध रिक्त पदांसाठी भरतीची मोठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तब्बल 9 हजार 126 जागांसाठी ही भरती राबवली जात आहे. त्यात प्राथमिक शिक्षकांची 3 हजार 365 पदे असून 1 हजार 115 पदे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आहेत. त्याचप्रमाणे प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची 2 हजार 794 पदे भरली जाणार असून 1 हजार 465 पदव्युत्तर शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. तसेच 58 उपप्राचार्यांची तर 134 प्राचार्यांची पदे भरण्यात येणार आहेत.तसेच 8 सहाय्यक आयुक्त यांची पदे आणि 147 ग्रंथपाल पदे भरली जाणार आहेत.
भरती संदर्भातील अधिक माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात तपासता येऊ शकते त्यात प्रत्येक पदासाठी आवश्यक पात्रता देण्यात आली आहे.पदासाठी अर्ज करण्याची वयोमार्यादा तसेच पदासाठी अर्ज करताना भरावा लागणारे शुल्क वेगवेगळे असून त्याचा स्पष्ट उल्लेख जाहिरातमध्ये करण्यात आला आहे.
eduvarta@gmail.com