TET परीक्षा देणारे पुणे, नाशिक, नांदेडमधील सर्वाधिक; 23 नोव्हेंबरला होणार परीक्षा

पुण्यातून 37 हजार 293 नाशिक येथून 32,031 तर नांदेड येथून 26 हजार 137 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी राज्यभरातील एकूण 4 लाख 75 हजार 668 उमेदवारांनी नोंदणी केली असून राज्यभरातील 1 हजार 420 परीक्षा केंद्रांवर या उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार आहे.

TET परीक्षा देणारे पुणे, नाशिक, नांदेडमधील सर्वाधिक; 23 नोव्हेंबरला होणार परीक्षा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (teacher eligibility test) अर्थात टीईटी परीक्षा (TET exam)उत्तीर्ण होणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा टीईटी परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या उमेदवारांची संख्या चांगलीच वाढली आहे.यंदा पुणे,नाशिक व नांदेड (Pune, Nashik and Nanded)येथून सर्वाधिक उमेदवारांनी टीईटी साठी नोंदणी केली आहे. पुण्यातून 37 हजार 293 नाशिक येथून 32,031 तर नांदेड येथून 26 हजार 137 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी राज्यभरातील एकूण 4 लाख 75 हजार 668 उमेदवारांनी नोंदणी केली असून राज्यभरातील 1 हजार 420 परीक्षा केंद्रांवर या उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार आहे.

राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर येत्या 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेची तयारी करण्यात आली असून पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक 2 अशा दोन पेपरसाठी स्वतंत्रपणे उमेदवारांनी नोंदणी केली आहे. त्यात पेपर क्रमांक 1 साठी नोंदणी केलेल्या उमेदवारांची संख्या 2 लाख 3 हजार 333 असून पेपर दोनसाठी 2 लाख 72 हजार 335 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. पेपर 1 साठी 569 परीक्षा केंद्र तयार करण्यात आले असून पेपर 2 साठी 851 परीक्षा केंद्र आहेत. त्यात पेपर 1 मधील गणित विषयाची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या 1 लाख 1 हजार 794 आहे. तर सामाजिक शास्त्र विषयाची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या 1 लाख 70 हजार 541 एवढी आहे.

परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांची जिल्हानिहाय आकडेवारी

मुंबई साउथ - 3,507, मुंबई वेस्ट- 4,981, मुंबई नॉर्थ- 4,162,रायगड-5,974, ठाणे -16,914, पालघर - 9,624, पुणे - 37,293, अहिल्यानगर - 22,850, सोलापूर- 21,305, नाशिक - 32,031, धुळे -15,479, जळगाव -13,200, नंदुरबार -10,258, कोल्हापूर -19,839, सातारा -11,971, सांगली -12,243, रत्नागिरी - 4,351, सिंधुदुर्ग - 2,423, छत्रपती संभाजी नगर - 24,200, जालना - 8,275, बीड - 13,991, परभणी - 11,057, हिंगोली - 5,308, अमरावती - 15,154, बुलढाणा - 11,283, अकोला - 9,794, वाशिम - 8,240, यवतमाळ -10,373, नागपूर -16,491, भंडारा - 8,776, गोंदिया - 8,415, वर्धा - 3,777, चंद्रपूर -9,284, गडचिरोली -7,038, लातूर -21,744, धाराशिव -7,926, नांदेड - 26,137