मिलिंद कांबळे NIT श्रीनगरच्या अध्यक्षपदी;अतिरिक्त जबाबदारी
गेल्या दहा वर्षांपासून मिलिंद कांबळे हे IIM जम्मूच्या अध्यक्षपदाची यशस्वीपणे धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली IIM जम्मूचा नवीन कॅम्पस वेगाने आणि भक्कम पद्धतीने विकसित होत आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (DICCI) चे संस्थापक आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) जम्मूचे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्याकडे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीने नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) श्रीनगरच्या अध्यक्षपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
गेल्या दहा वर्षांपासून मिलिंद कांबळे हे IIM जम्मूच्या अध्यक्षपदाची यशस्वीपणे धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली IIM जम्मूचा नवीन कॅम्पस वेगाने आणि भक्कम पद्धतीने विकसित होत आहे. यासोबतच ते भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध समित्यांवर सल्लागार म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत.
उद्योग क्षेत्राबरोबरच शिक्षण क्षेत्रातही मिलिंद कांबळे यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.अनेक होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध पातळ्यांवर त्यांच्याकडून योगदान दिले जात आहे. आयआयएम जम्मू नंतर आता एनआयटी जम्मूच्या अध्यक्षपदाची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्याकडे आल्यामुळे एनआयटीच्या विकासाच्या दृष्टीने त्यांच्याकडून महत्त्वपूर्ण घेतले जातील.
eduvarta@gmail.com