शिक्षकांची २१ हजार पदे भरून उमेदवारांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम - रोहित पवार 

कदाचित या सरकारला शिक्षकांचीही कंत्राटी भरती करायची असेल, पण आम्ही त्यांचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही.

शिक्षकांची २१ हजार पदे भरून उमेदवारांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम -  रोहित पवार 

एज्युवार्ता न्यूड नेटवर्क

मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या शिक्षक भरतीला (Teacher Recruitment) आता कुठे मुहुर्त मिळाला आहे. त्यासंर्भात राज्य सरकारने पवित्र पोर्टल (Pavitra Portal) या संकेतस्थळावर जाहिराती प्रसिद्ध (Advertisements published) केल्या आहेत. उमेदवार ज्या भरतीकडे डोळे लावून बसले होते, त्याला आता वेग आला आहे. एकूण २१ हजार ६७८ पदांसाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, ६७ हजार शिक्षकांची रिक्त (67 thousand teacher vacancies) जागा असताना २१ जागांची भरती करणे म्हणजे हे उमेदवारांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम चालू आहे, अशी खरमरीत टीका आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारवर केली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आपल्या एक्स या अकाउंटवर म्हणाले आहेत की, राज्यात शिक्षकांच्या ६७ हजारांपेक्षाही अधिक जागा रिक्त आहेत. दोन लाखांपेक्षाही अधिक उमेदवार अनेक वर्षांपासून शिक्षकभरतीच्या प्रतिक्षेत आहेत. अशा परिस्थितीत राज्य शासनाने केवळ २१ हजार शिक्षक भरतीची प्रक्रीया सुरु केलीय. पुरेशा शिक्षकांअभावी एका शिक्षकाला दोन-दोन, तीन-तीन वर्ग सांभाळावे लागता आहेत. त्यामुळे शिक्षकांवर ताण येत आहे.

भावी पिढीचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षक भरतीसाठी पात्र असलेले उमेदवार वेळेत भरती केली जात नसल्याने लाखो युवा वय मर्यादा संपण्याच्या काठावर आहेत. म्हणजेच शासनाच्या अनास्थेमुळे एकाच वेळी दोन पिढ्या बदबाद होत आहेत. मात्र,  सरकारला त्याचे काहीही देणेघेणे पडलेले नाही. कदाचित या सरकारला शिक्षकांचीही कंत्राटी भरती करायची असेल, पण आम्ही त्यांचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही. त्यामुळे सरकारने अनावश्यक पोपटपंची बंद करून शिक्षकांच्या शंभर टक्के रिक्त जागा भराव्यात,अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.