२४ नोव्हेंबरला शाळा बंद; TET सक्तीविरोधात संघटना एकवटल्या
राज्य शासनाने टीईटी बाबत इतर राज्यांप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे, या मागणी सह इतर मागण्यांसाठी २४ नोव्हेंबर रोजी शाळा बंद ठेवून राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चे काढण्यात येणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी (Teachers' Union) टीईटी सक्ती (TET Binding) विरोधात एकमुखी एल्गार पुकारला आहे. 'सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) १ सप्टेंबरच्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्तीच्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी (A reconsideration petition should be filed) आणि केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा करावा. दोन आठवड्याच्या आत याबाबत कार्यवाही झाली नाही, तर २४ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील शिक्षक शाळा बंद आंदोलन (School closure protest) करतील ,' असा इशारा राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी दिला आहे.
आंदोलनानंतरही पुनर्विचार याचिका दाखल झाली नाही, तर संघटना थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. राज्य शासनाने टीईटी बाबत इतर राज्यांप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केलीच पाहिजे, या मागणी सह इतर मागण्यांसाठी २४ नोव्हेंबर रोजी शाळा बंद ठेवून राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चे काढण्यात येणार असल्याची माहिती, शिक्षक संघाचे संभाजी थोरात यांनी दिली.
४ नोव्हेंबर रोजी पुणे येथे झालेल्या शिक्षक समन्वय समितीच्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. TET संदर्भात राज्य सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी होत असलेली दिरंगाई तसेच TET निकालाच्या चुकीच्या अर्थामुळे सुरू असलेल्या अन्यायकारक कारवाया याबाबत शिक्षक वर्गातील तीव्र असंतोष आणि जनाक्रोश याची दखल शासनाकडून घेतली जावी, अशा मागणी करण्यात आली आहे.
दिनांक 24 नोव्हेंबर 2025 (सोमवार) रोजी राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर महा मोर्चा काढण्याचा आणि शाळा बंद आंदोलन छेडण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. या आंदोलनाद्वारे शिक्षकांच्या जुनी पेन्शन, शिक्षण सेवक नियमितीकरण, 15 मार्च संचमान्यता, 10-20-30 प्रगती योजना, वस्तीशाळा शिक्षक सेवासातत्य तसेच इतर प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.विविध संघटनांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.
eduvarta@gmail.com